Naxal :अग्निवीर आंदोलनात माओवाद्यांचा सहभाग; काय आहे माओवाद्यांचा कट?

नक्षलवाद्यांनी प्रकाशित केलेल्या २२ पानी पुस्तिकेत अनेक धक्कादायक खुलासा करण्यात आले आहेत.
Naxal
Naxalesakal
Updated on

नक्षलवादी देशात विविध आंदोलनात शिरकाव करून कसे अस्थिरता निर्माण करत आहेत याचा आणखी एक पुरावा समोर आलाय. शेतकरी आंदोलन आणि अग्निवीर विरोधी आंदोलनात नक्षलवाद्यांचा सहभाग होता याची कबुली माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीच्या पत्रातच देण्यात आली. (Naxal in Protest Against agniveer and protest at singhu border)

भाकप माओवादी संघटनेला आज अठरा वर्षे पूर्ण होतायत. या निमित्तानं संघटनेच्या सेेंट्रल कमिटीनं काढलेलं पत्र माझाच्या हाती लागलंय. युनायटेड फोरम म्हणजेच संयुक्त मोर्चाच्या माध्यमातून माओवाद्यांनी गोपनीय मार्गानं अनेक आंदोलनात शिरकाव केल्याची माहिती या पत्रात देण्यात आली आहे.

अग्निवीर योजनेच्या विरोधात झालेल्या आंदोलनात सहभाग नोंदवला असल्याचे माओवाद्यांच्या दस्तऐवजात नमूद करण्यात आले आहे. लोकांच्या आंदोलनात रणनीती आखून सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहनही माओवाद्यांनी केले आहे. केंद्र सरकारच्या धोरणांवरही माओवाद्यांनी टीका केली आहे.

Naxal
Shivsena : आदित्य ठाकरेंच्या लग्नावरुन सेनेनं सोडलं मौन; मोदींच्या पत्नीचा उल्लेख करत म्हणाले...

नक्षलवाद्यांनी प्रकाशित केलेल्या २२ पानी पुस्तिकेत अनेक धक्कादायक खुलासा करण्यात आले आहेत. या पुस्तिकेत नक्षल्यांनी ग्रामीण आणि शहरी भागात प्रभाव वाढवण्याची रणनीती आखली असल्याचे स्पष्ट होत आहे. माओवाद्यांनी २१ ते २७ सप्टेंबर दरम्यान पक्षाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना, समर्थकांना केले आहे.

तसेच, सिंघू बॉर्डरवर झालेल्या शेतकरी आंदोलनातही नक्षलवाद्यांनी सहभाग घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या दस्तावेजात याचा उल्लेख आहे.

नक्षलवाद्यांनी काही राज्यांमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठीदेखील प्रयत्न सुरू केल्याचे या दस्तऐवजातून समोर आले आहे. तसेच नक्षल्यांनी देशांतील काही आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला असल्याचे म्हटले आहे. यामध्ये कृषी कायद्याविरोधात झालेले शेतकरी आंदोलनाचाही समावेश आहे. या कृषी कायदाविरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवण्यात आला.

Naxal
Eknath Shinde: शरद पवारांच्या चौकशीच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

माओवाद्यांनी आपल्या दस्तऐवजात धार्मिक अल्पसंख्याकांवर विशेषतः मुस्लिम, ख्रिश्चनांवर लक्ष्य करण्यात येत असल्याचे म्हटले. त्यांच्यासह आदिवासी, दलित, महिला, विद्यार्थी-बुद्धिजीवी वर्गावर दडपशाही सुरू असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना 'अर्बन नक्षल' म्हणून शिक्का मारून त्यांचा छळ सुरू आहे. या सगळ्याला विरोध आंदोलने करण्यात आली असल्याचे नक्षलवाद्यांनी म्हटले आहे.

ज्या ठिकाणी ताकद नाही, अशा ठिकाणी सहभाग नोंदवण्यात आला होता. तर, ज्या ठिकाणी माओवादी पक्ष मजबूत आहे, त्या ठिकाणी नेतृत्व केले असल्याचे नक्षलवाद्यांनी त्यांच्या दस्तऐवजात नमूद केले आहे.

Naxal
Agra : बलात्कार, गर्भपात आणि नंतर दुसरं लग्न.. भाजप आमदारासह मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

सीपीआय या बंदी घातलेल्या संघटनेने देशातील शहरी भागांना लक्ष्य करण्याची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र, बिहार, छत्तीसगड, ओरिसा आणि झारखंड या राज्यांतील शहरी भागात माओवादी आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. या राज्यातील शहरी भागात गनिमी काव्याने जनआंदोलन उभारण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी आपल्या दस्तऐवजात केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()