KCR: मुख्यमंत्र्यांनी केला धरणात घोटाळा, नक्षलवाद्यांचे तेलुगू भाषेत पत्र लिहित KCR यांच्यावर आरोप

नक्षलवाद्यांकडून तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत.
KCR: मुख्यमंत्र्यांनी केला धरणात घोटाळा, नक्षलवाद्यांचे तेलुगू भाषेत पत्र लिहित KCR यांच्यावर आरोप
Updated on

गडचिरोली जिल्ह्यातील खनिकर्म क्षेत्राबद्दल टिकेची झोड उडविणाऱ्या नक्षलवाद्यांनी आता आपली वक्रदृष्टी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडे वळवली असून तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील मेडीगड्डा धरणाच्या बांधकामात राव व त्यांच्या कुटुंबियांनी घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. नक्षल्यांचे तेलुगू भाषेतील एक पत्र व्हायरल झाले असून त्यात त्यांनी हा आरोप केला आहे.

२१ ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास मेडीगड्डा धरणावरील पुलाच्या तीन खांबांना तडे गेल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे तेलंगणा सरकारने या मार्गावरील वाहतूक बंद करून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता. पुलाच्या खांबांना तडे गेल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. तेलंगणात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर या मुद्यावरून विरोधी पक्षाने टीकेची झोड उठवली असताना आता या वादात नक्षलवाद्यांनीही उडी घेतली आहे. एक पत्रक काढून त्यांनी मुख्यमंत्री केसीआर व त्यांच्या कुटुंबीयांवर धरण बांधकामात मोठा घोटाळा केल्याचे आरोप केले आहेत.

या घटनेनंतर धरणातील पाणी अचानक सोडल्याने महाराष्ट्रातील सिरोंचा तालुक्याला याचा फटका बसला. त्यामुळे अनेकांची शेते पाण्याखाली गेली तसेच जनावरेही वाहून गेली. त्यामुळे धरणाच्या बांधकामावर प्रश्न निर्माण झाले आहेत. तेलंगणात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याविरोधात विरोधकांच्या हाती आयते कोलीत आले आहे. यात आता नक्षलवाद्यांनी तेलुगुतून एक पत्रक काढून उडी घेतली आहे.

समाजमाध्यमावर सार्वत्रिक झालेल्या या पत्रकात नक्षल्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी देखील या सिंचन प्रकल्पात मोठे कमिशन घेतल्याचेही म्हटले आहे. त्यामुळेच धरण बांधकामाच्या वेळेस पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माध्यमांना देखील पत्रकातून धमकावण्यात आले आहे. (Latest Marathi News)

KCR: मुख्यमंत्र्यांनी केला धरणात घोटाळा, नक्षलवाद्यांचे तेलुगू भाषेत पत्र लिहित KCR यांच्यावर आरोप
Maratha Reservation : अजित पवारांचे दोन शिलेदार देणार राजीनामा? मराठा आरक्षण आंदोलन पेटलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.