Chhattisgarh Naxals : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दहा पोलिस हुतात्मा झाले. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांत नक्षलवाद्यांच्या हल्ल्याच्या महत्त्वाच्या घटना ः
एप्रिल २०२१ ः बिजापूर-सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवरील तेर्राम जंगलातील चकमकीत सुरक्षा दलाचे २२ जवान हुतात्मा
मार्च २०१८ ः सुकमा जिल्ह्यात माओवादी बंडखोरांनी केलेल्या आयईडी स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) नऊ जवान हुतात्मा
१८ फेब्रुवारी २०१८ ः सुकमा जिल्ह्यातील भेज्जी येथील चमककीत नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात छत्तीसगड पोलिस दलाचे दोन जवान हुतात्मा
२४ एप्रिल २०१७ ः माओवाद्यांविरुद्धच्या चकमकीत सुकमा जिल्ह्यात सीआरपीएफचे २४ जवान हुतात्मा
१२ मार्च २०१७ ः सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांच्या हल्ल्यात १२ सीआरपीएफचे १२ जवान हुतात्मा
११ मार्च २०१४ ः सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांच्या हल्ल्यात १५ जवान हुतात्मा
२८ फेब्रुवारी २०१४ ः दंतेवाडा जिल्ह्यात माओवाद्यांच्या हल्ल्यात सहा पोलिस अधिकारी हुतात्मा
२५ मे २०१३ ः दरभा खोऱ्यात माओवाद्यांच्या हल्ल्यात माजी मंत्री महेंद्र कर्मा यांच्यासह काँग्रेस पक्षाचे २५ नेते मृत्युमुखी
२९ जून २०१० ः नारायणपूर जिल्ह्यात माओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे २६ जवान हुतात्मा
८ मे २०१० ः बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी बुलेटप्रूफ वाहनाचा स्फोट घडविल्याने सीआरपीएफचे आठ जवान हुतात्मा
६ एप्रिल २०१० ः दंतेवाडा जिल्ह्यात माओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे ७५ जवान हुतात्मा
४ सप्टेंबर २००९ ः बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांकडून चार गावकऱ्यांची हत्या
२७ जुलै २००९ ः दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडविलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात सहा व्यक्तींचा बळी
१८ जुलै २००९ ः बस्तर जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून गावकऱ्याचा बळी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.