भागलपूर पोलिस-प्रशासन (Bhagalpur Police) संघटना प्रमुखांच्या आगमनाबाबत आधीच सतर्क आहे.
भागलपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (RSS) मोहन भागवत (Mohan Bhagwat) उद्या 10 फेब्रुवारीला भागलपूरला येणार आहेत.
दरम्यान, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) आणि नक्षलवादी संघटनांनी (Naxalite Organization) मोहन भागवत यांना धमकी दिलीये. त्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झालंय.
भागलपूर पोलिस-प्रशासन (Bhagalpur Police) संघटना प्रमुखांच्या आगमनाबाबत आधीच सतर्क आहे. एसएसपी आनंद कुमार आणि एसडीओ सदर धनंजय कुमार सुरक्षा व्यवस्थेबाबत अखिल भारतीय संत महासभेच्या पदाधिकाऱ्यांशी आणि परमहंस महाराजांच्या कुप्पा घाट आश्रमाच्या नियामक मंडळाच्या सतत संपर्कात आहे. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आश्रमाला भेट देत संबंधित विषयांवर चर्चा केली.
मोहन भागवत यांचं आगमन आणि दहशतवादी धोक्याची शक्यता पाहता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरक्षा यंत्रणांशी संबंधित अधिका-यांचं पथक शहराला भेट देऊन आजूबाजूच्या भागातील सुरक्षा व्यवस्था आणि हालचालींवर लक्ष ठेवून आहे. नेपाळ सीमेजवळ अररिया, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, नवगचिया, भागलपूर, बांका इथं होत असलेल्या हालचालींवरही सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून आहेत.
केंद्रातून आलेलं सुरक्षा दल आश्रमात राहणाऱ्या संत आणि भाविकांची चौकशी करत आहे. तंबू, पाणी आदी ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना आश्रमाच्या वतीनं ओळखपत्र देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर, दुसरीकडं पत्रकारांपासून प्रवाशांपर्यंत सर्वांना पास देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला फक्त अधिकृत लोकच प्रवेश करू शकतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.