In Revised NCERT Textbook: 'बाबरी मशिदीचे नाव गायब! NCERTच्या नवीन पाठ्यपुस्तकात अयोध्या वादाचं पुनर्लेखन

In Revised NCERT Textbook: एनसीईआरटीने इयत्ता 12वीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकातील अयोध्या वादावरील प्रकरण लहान केले आहे. यामध्ये बाबरी मशिदीचे नाव काढून तिला तीन घुमट वास्तू असे संबोधण्यात आले आहे.
In Revised NCERT Textbook
In Revised NCERT TextbookEsakal
Updated on

बारावीच्या सामाजिक शास्त्राच्या NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचे नावही हटवण्यात आले आहे. आता नवीन पुस्तकात याला 'तीन घुमट रचना' असे संबोधण्यात आले आहे. अयोध्येचा अध्याय चार पानांवरून फक्त दोन करण्यात आला आहे. यात भाजपची सोमनाथ ते अयोध्येपर्यंतची रथयात्रा, कारसेवकांची भूमिका, बाबरी मशीद पाडल्यानंतर झालेला हिंसाचार, राष्ट्रपती राजवट आणि अयोध्येतील हिंसाचाराबद्दल भाजपच्या खेदजनक बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, जुन्या पाठ्यपुस्तकात असे सांगण्यात आले आहे की, १६व्या शतकात मुघल सम्राट बाबरचा सेनापती मीर बाकी याने बाबरी मशीद बांधली होती. आता या अध्यायात श्रीरामाच्या जन्मस्थानी १५२८ मध्ये तीन घुमटाची रचना बांधण्यात आली असल्याचे सांगितले आहे. या संरचनेत अनेक हिंदू चिन्हे होती. याशिवाय आतील व बाहेरील भिंतींवर शिल्पे होती.

1986 मध्ये फैजाबाद जिल्हा न्यायालयाने मशीद उघडण्याच्या निर्णयानंतर जमाव कसा जमवला होता, हे जुन्या पुस्तकात दोन पानांत सांगण्यात आले होते. 1992 मध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी रथयात्रा आणि कार सेवेमुळे जातीय तणाव निर्माण झाला होता. यानंतर 1993 मध्ये जातीय दंगल झाली. यावेळी भाजपने अयोध्येतील घटनांवर दु:ख व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.

In Revised NCERT Textbook
Stock Market Exit Polls : ‘एक्झिट पोल’च्या परिणामाची चौकशी करा;तृणमूलची मागणी,शिष्टमंडळ सेबी अध्यक्षांना भेटणार

नवीन पुस्तकात काय आहे?

नवीन पुस्तकात म्हटले आहे की, 1986 मध्ये फैजाबाद जिल्हा न्यायालयाने तीन घुमटाची रचना उघडण्याचे आदेश दिले आणि लोकांना पूजा करण्याची परवानगी दिली. ही तीन घुमट रचना श्री राम जन्मस्थानी बांधली गेली असे मानले जाते. राम मंदिराची पायाभरणी झाली पण पुढच्या बांधकामावर बंदी घालण्यात आली.

हिंदू समाजाला वाटले की, त्यांच्या श्रद्धेशी छेडछाड केली जात आहे आणि मुस्लिम समाजाला संरचनेवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळत आहे. 1992 मध्ये संरचना कोसळल्यानंतर, अनेक टीकाकारांनी म्हटले की, हे लोकशाहीच्या तत्त्वांना मोठे आव्हान असल्याचे सिद्ध होईल.

In Revised NCERT Textbook
Rudraprayag Accident: एक डुलकी अन् क्षणात बस कोसळली दरीत...१४ जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा नव्या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने ही जमीन मंदिराच्या मालकीचा असल्याचा निकाल दिला. बाबरी पाडल्यानंतर कल्याण सिंह सरकार हटवण्याच्या आदेशाचा समावेश असलेल्या जुन्या पुस्तकात काही वृत्तपत्रांच्या कटिंग्जची फोटो समाविष्ट करण्यात आले होते. ते आता काढण्यात आले आहे.

2014 पासून NCERT चे पुस्तक चौथ्यांदा बदल करण्यात आले आहेत. एप्रिलमध्ये एनसीईआरटीने म्हटले होते की, राजकारणातील अलीकडील घडामोडींच्या आधारे अध्यायांमध्ये बदल केले जातात आणि नवीन गोष्टींचा समावेश केला जातो.

In Revised NCERT Textbook
Heavy Rain : पावसामुळे सिक्कीममध्ये हाहाकार! रस्ते खचले, नऊ जणांचा मृत्यू,‘तिस्ता’ची पातळी वाढली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.