NCERT Syllabus: शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये दंगलीबद्दल का शिकवायचे? ; 'बाबरी मशीद'चे नाव हटवल्यानंतर NCERT संचालकांचा सवाल

NCERT Syllabus Change: यावेळी NCERT ने पुन्हा अभ्यासक्रम अपडेट केला आहे. त्यातील अनेक गोष्टी काढून टाकल्या आहेत, विशेषत: बाबरी मशिदीचे नाव काढून टाकले आहे. इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात बाबरी मशिदीऐवजी 'तीन घुमट रचना' असा उल्लेख करण्यात आला आहे.
 Dinesh Prasad Saklani
Dinesh Prasad Saklaniesakal
Updated on

बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून 'बाबरी मशीद'चे नाव हटवण्यासह अनेक बदलांनंतर NCERT संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांचे विधान समोर आले आहे. त्यांनी पीटीआय मुलाखत दिली. अभ्यासक्रमाचे भगवेकरण करण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही. पाठ्यपुस्तकातील सर्व बदल पुरावे आणि तथ्यांवर आधारित आहेत, असल्याचे सकलानी यांनी स्पष्ट केले.

एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये दंगलीबद्दल शिकवणे हिंसक -

NCERT इयत्ता 12 च्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात बदल केल्याचा भगवेकरण केल्याचा आरोप दिनेश प्रसाद सकलानी यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले, "गुजरात दंगल आणि बाबरी मशीद विध्वंस यासारखे विषय काढून टाकण्यात आले. कारण दंगलींबद्दल शिकवल्याने हिंसाचार आणि निराशा निर्माण होऊ शकते. शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये दंगलीबद्दल का शिकवायचे? आम्हाला सकारात्मक नागरिक घडवायचे आहेत, हिंसक आणि नैराश्याचे नाही. द्वेष आणि हिंसा हे शिकवण्यासारखे विषय नाहीत, ते आपल्या पाठ्यपुस्तकांचे केंद्रबिंदू नसावेत."

पाठ्यपुस्तकांमध्ये दरवर्षी बदल होत असतात आणि यावेळीही हा बदल त्याच पुनरावृत्तीचा एक भाग आहे. शाळांमध्ये इतिहास हा रणांगण बनवण्यासाठी नव्हे तर वस्तुस्थितीची माहिती देण्यासाठी शिकवला जातो. एनसीईआरटीच्या पुस्तकांच्या अभ्यासक्रमात 1984 च्या दंगलीचा उल्लेख नाही पण त्याबाबत तसा गदारोळही केला जात नाही, असे देखील प्रसाद सकलानी यांनी सांगितले.

 Dinesh Prasad Saklani
ईव्हीएम अन् ओटीपी... वायकर-किर्तीकर मतमोजणी प्रकरणात ECI अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

NCERT च्या अभ्यासक्रमात काय बदल?

यावेळी NCERT ने पुन्हा अभ्यासक्रम अपडेट केला आहे. त्यातील अनेक गोष्टी काढून टाकल्या आहेत, विशेषत: बाबरी मशिदीचे नाव काढून टाकले आहे. इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात बाबरी मशिदीऐवजी 'तीन घुमट रचना' असा उल्लेख करण्यात आला आहे. यापूर्वी अयोध्या प्रकरणाचा उल्लेख 4 पानांमध्ये करण्यात आला होता, तो दोन पानांचा करण्यात आला असून अयोध्या वाद ऐवजी अयोध्या विषय असा उल्लेख करण्यात आला आहे.

हुमायून, शाहजहान, अकबर, जहांगीर आणि औरंगजेब यांसारख्या मुघल नवाबांच्या कामगिरीची माहिती देणारा दोन पानांचा तक्ताही अद्ययावत पाठ्यपुस्तकातून काढून टाकण्यात आला आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बाबरी मशिदीची ओळख जुन्या पुस्तकात मुघल सम्राट बाबरचा सेनापती मीर बाकी यांनी बांधलेली १६ व्या शतकातील मशीद म्हणून करण्यात आली आहे. आता यात बदल करण्यात आला आहे. नवीन पुस्तकात ‘तीन घुमट रचना’ असे वर्णन केले आहे. आणि ही रचना 1528 मध्ये श्री रामच्या जन्मस्थानावर बांधली गेली असे म्हटले जाते, परंतु संरचनेच्या आतील आणि बाहेरील भागात हिंदू चिन्हे आणि अवशेषांचे दृश्यमान प्रदर्शन होते.

 Dinesh Prasad Saklani
In Revised NCERT Textbook: 'बाबरी मशिदीचे नाव गायब! NCERTच्या नवीन पाठ्यपुस्तकात अयोध्या वादाचं पुनर्लेखन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.