Sharad Pawar : रामभक्तांना डावलून अयोध्येत फक्त भाजप भक्तांनाच महत्त्‍व दिलं जातंय; शरद पवारांचा रोख कोणावर?

राम मंदिर बांधण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी संमती देऊन त्याचा शिलान्यासही केला होता.
Sharad Pawar Nipani Belgaum
Sharad Pawar Nipani Belgaumesakal
Updated on
Summary

'एका पराभवाने डाव संपत नाही. मी व आमच्या पक्षाचे सर्व नेते उत्तम पाटील यांच्या पाठीशी आहोत.'

निपाणी : देशात सध्या सामाजिक तेढ वाढविण्याचे राजकारण सुरू आहे. अयोध्येत राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) निर्माण होत असल्याचा सर्वांना आनंदच आहे. पण, त्याचे राजकारण करणे बरे नाही. राम मंदिर बांधण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी संमती देऊन त्याचा शिलान्यासही केला होता. त्यानंतर न्यायालयात काहीजण गेल्याने हे कार्य थांबले होते. आता ते न्यायालयाच्या निकालाने मार्गी लागत असले तरी आता या गोष्टींचे राजकारण केले जात आहे. रामभक्तांना डावलून केवळ भाजप भक्तांना महत्त्‍व दिले जात आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे.

Sharad Pawar Nipani Belgaum
मोठी बातमी! 'मंत्री नारायण राणे वाढत्या वयोमानामुळं लोकसभेची निवडणूक लढणार नाहीत'; नीलेश राणे यांची माहिती

दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील (दादा) यांना कर्नाटक जैन असोसिएशन यांच्यावतीने जैनधर्म प्रभावक पुरस्कार, तसेच राष्ट्रवादीचे नेते उत्तम पाटील (Uttam Patil) यांना कर्नाटक सहकाररत्न पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते.

पवार पुढे म्हणाले, ‘‘सहकार चळवळीच्या माध्यमातून सहकारत्न रावसाहेब पाटील यांनी कर्नाटकासह महाराष्ट्रात शैक्षणिक, सामाजिक धार्मिक कार्य केले आहेत. सहकारामुळेच या भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. त्यांचे पुत्र उत्तम पाटील यांना उज्ज्वल भविष्य आहे. एका पराभवाने डाव संपत नाही. मी व आमच्या पक्षाचे सर्व नेते उत्तम पाटील यांच्या पाठीशी आहोत. उत्तम पाटील यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवूनही ६६ हजारावर मते मतदारांनी दिली आहेत. त्यामुळे उत्तम पाटील यांनी सतत कार्यरत राहावे. त्यांना राजकारणात चांगले दिवस नक्की येतील.

माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले, ‘‘या भागात ग्रामपंचायत निवडणुकीतील मिळालेले यश आणि उत्साह टिकून ठेवला पाहिजे. माता-भगिनींची साथ असल्यास कुठल्याही निवडणुकीत विजय निश्चित आहे. उत्तम यांचे भवितव्य उत्तम आहे.’’

Sharad Pawar Nipani Belgaum
Loksabha Election : लोकसभेसाठी हसन मुश्रीफांची मोठी घोषणा, पण निर्णय दिल्लीतूनच होणार; असं काय म्हणाले मुश्रीफ?

सहकाररत्न उत्तम पाटील म्हणाले, ‘‘सहकार महर्षी रावसाहेब पाटील यांनी आयुष्यभर ज्या लोकांना साथ दिली, त्यांनीच निवडणुकीच्या वेळी पाठ फिरवली. शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे तिकीट देऊन आपणाला निवडणूक लढवण्यास मदत केली. कोणतीही सत्ता नसताना संघ-संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्यांची कामे करीत आहोत.’’ यावेळी पवार पुढे म्हणाले, ‘‘आरएसएस आणि भाजपकडून राम मंदिराचा वापर करून घेतला जात आहे. राम मंदिराला कुणाचाही विरोध नाही. फक्त त्यांच्या कृतीवर आणि त्यांनी याचा राजकीय वापर करण्याचा प्रयत्न केल्याने त्या वृत्तीचा विरोध करण्यात येत आहे.’’

केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवित आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा लोकांची असते. पण, ते होताना दिसत नाही. दहा-पंधरा वर्षांत ऊस शेतीपान वाढली असली असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेला चांगला दर मिळत आहे. त्या मानाने अजूनही उसाला जादा दर देणे आवश्यक आहे, असे पवार म्हणाले.

Sharad Pawar Nipani Belgaum
Kagal Ram Mandir : कागलमधील श्रीराम मंदिर बांधण्यात माझं मोठं योगदान; असं का म्हणाले हसन मुश्रीफ?

यावेळी अशोककुमार असोदे, प्रकाश मोरे, सचिन पोवार, राजवर्धिनी पाटील, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, सोनू कदम, संभाजी थोरवत यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सीमा पाटील यांनी स्वागत केले. सहकारमहर्षी रावसाहेब पाटील व सहकारत्न उत्तम पाटील यांचा शरद पवार व जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. प्रा. सचिन खोत यांनी आभार मानले.

ठळक मुद्दे

  • - राम मंदिर वास्तुशांतीप्रमाणे लोकांच्या समस्या सोडविण्याचाही सोहळा व्हावा.

  • - देशात भाजपविरोधी शक्ती एकत्र येत असून त्यात लोकाहिताला प्राधान्य.

  • - शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचार करण्यास भाजप सरकारला वेळच नसल्याची स्थिती.

  • - साखरेला चांगला दर असल्याने उसाला अधिक दर देण्यासाठी केंद्राचे प्रयत्न हवेत.

Sharad Pawar Nipani Belgaum
'भाजपमध्ये परतण्यासाठी माझ्यावर दबाव, पण मी माघारी फिरणार नाही'; माजी मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

उत्तम पाटील यांना फसवले

माजी आमदार प्रा. सुभाष जोशी म्हणाले, उत्तम पाटील हे २०१८ मध्ये निवडणूक लढविण्यास सज्ज होते. त्यावेळी मी व निपाणीचे माजी आमदार अशा तिघांनी मिळून उत्तम यांना आता नको २०२३ ची निवडणूक लढवा. आम्ही त्यावेळी तुमच्या सोबत राहू असे सांगितले होते. तेच लोक २०२३ मध्ये पुन्हा निवडणुकीत उतरल्याने उत्तम पाटील यांची फसवणूक झाली. त्याबद्दल न बोलता आता उत्तम पाटील पुढील वेळी निश्चित विजयी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.