नवी दिल्ली : निवडणूक आयोगात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीसंदर्भात सुनावणी सुरु आहे. आज दिवसभरात अजित पवार गटाच्या वकिलांनी बाजू मांडली. यावेळी शरद पवारांवर समोरच्या गटानं आरोपांची सरबत्ती केल्यानंतर शरद पवार गटानं सुनावणीमध्येच अजित पवार गटाला सवाल विचारला. (NCP Hearing ECI Ajit Pawar group should give names of MLA Sharad Pawar group demand)
सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर अजित पवार गटाचे वकील अॅड. नीरज कौल आणि अॅड. मनिंदर सिंग यांनी बाजू मांडली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर वैयक्तीक आरोप करताना ते पक्ष घरासारखा मनमानी पद्धतीनं चालवत असल्याचा आरोप केला. शरद पवार यांची नियुक्ती निवडणुकीच्या माध्यमातून झालेली नाही. पक्षामध्ये नियमाचं पालन केलं जात नाही, असा आरोपही यावेळी करण्यात आला. (Latest Marathi News)
यावेळी अजित पवार गटानं आपल्याकडं १ लाख शपथपत्र असल्याचा दावा केला तर शरद पवार गटानं ४० हजार शपथपत्र असल्याचा दावा केला. पण हा युक्तीवाद सुरु असताना मध्येच थांबवत शरद पवारांचे वकील अभिषेक मनु सिंगवी यांनी अजित पवार गटानं आमदारांचा आकडा नव्हे तर नावं सांगावीत अशी मागणी केली. (Latest Marathi News)
दरम्यान, अजित पवार गटाचा युक्तीवाद पूर्ण झाला त्यामुळं आजची सुनावणी संपली असून आता पुढची सुनावणी ९ नोव्हेंबरला होणार आहे. यामुळं महिन्याभरासाठी ही सुनावणी लांबणार आहे. यावेळी शरद पवार गटाला आपली बाजू मांडायची आहे. त्यामुळं शरद पवार गटाकडून कुठले मुद्दे मांडले जातात हे पाहणं महत्वाचं ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.