NCP Lok Sabha MP Mohammed Faizal : राज्यात सध्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख हे काही दिवसांपूर्वी तुरुंगाबाहेर आले आहेत तर नवाब मलिक हे अद्याप तुरुंगातच आहेत, यादरम्यान राष्ट्रवादीचे राज्याबाहेरील एकमेव खासदार मोहम्मद फैजल यांना आज खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणात 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लक्षद्विपच्या करवत्ती जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्षद्विपचे खासदार मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे सहकारी मानले जातात. फैजल यांना यांना 2009 च्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फैजल हे 2014 पासून संसदेत या केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करत आहेत.दरम्यान फैजल आणि अन्य तीन दोषींचा जामीन न्यायालयाने रद्द केला.
आरोप काय आहे?
या प्रकरणात एकूण 23 आरोपी होते, त्यापैकी 4 आरोपींना शिक्षा झाली. फैजल यांच्यावर त्यांचे नातेवाईक मोहम्मद सलीह यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. दोषींवर प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. फैसल म्हणाले की हे राजकीयदृष्ट्या प्रेरित प्रकरण आहे आणि ते लवकरच वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करणार आहेत.
त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपात म्हटले आहे की, फैजल यांनी लोकांच्या एका गटाचे नेतृत्व केले होते ज्यांनी सलीह यांच्यावर हल्ला केला. एका शेडच्या बांधकामावरून झालेल्या वादानंतर सलीह हे गंभीर जखमी झाले.
त्यानंतर सलीह यांना केरळला नेण्यात आले, तेथे त्यांच्यावर अनेक महिने रुग्णालयात उपचार करण्यात आले. मोहम्मद सलीह हे लक्षद्वीपचे दिवंगत माजी लोकसभा सदस्य आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पीएम सईद यांचे जावई आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.