Pune News : दिल्लीसाठी महत्वाचे सेवा विधेयक आज लोकसभेच्या कामकाजात नसल्याने ते उद्या राज्यसभेत मांडले जाण्याची शक्यता धुसर झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी (१ ऑगस्ट) पुण्यात थांबणार की दिल्लीला राज्यसभेतील मतदानासाठी उपस्थित राहणार? असा प्रश्न विचारला जात होता. यादरम्यान पुण्यातील पीएम मोदींच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याबाबत शरद पवार यांच्यासमोरचा अडथळा दूर होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पवारांनी दिल्लीतील सेवा विधेयक मांडले जात असताना संसदेत उपस्थित राहावं अशी विनंती केली होती.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या या विधेयकाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टींगबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय उलटवणारा अध्यादेश केंद्र सरकारने काढला होता. हा अध्यादेश विधेयकाच्या स्वरुपात मांडून मंजूर करायचा असेल तर त्यासाठी राज्यभेत मतदान होणे अपेक्षित आहे. या दरम्यान या विधेयकाच्या मुद्द्यावर समर्थनासाठी अरविंद केजरीवाल यांनी देशातील वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यांंनी शरद पवार यांची देखील भेट घेतली होती.
शरद पवारांपुढील पेच सुटला?
विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर ते राज्यसभेत मंजूरीसाठी येईल. त्यानंतर यावर मतदान घेतलं जाणार आहे. यासाठी शरद पवारांनी राज्यसभेत उपस्थित राहावे अशी विनंती केजरीवाल करत आहेत. यादरम्यान आजचं लोकसभेच्या कामकाजाच्या यादीत मात्र या विधेयकाचा समावेश नाहीये. पण कधी-कधी पूर्वसूचना न देता अचानक विधेयक कामकाजाच्या यादीत आणलं जातं. याच प्रकारे ३७० चं विधेयक ऐनवेळी सरकारकडून आणलं गेलं होतं.
दरम्यान सत्ताधाऱ्यांकडून दिल्लीतील हे सेवा विधेयक पहिल्यांदा लोकसभेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेत एनडीएचे ३३२ खासदार म्हणजेच पुरेसं संख्याबळ आहे. त्यामुळे हे पहिल्यांदा लोकसभेत मांडून नंतर ते राज्यसभेत मांडलं जाईल. मात्र आज जर हे विधेयक लोकसभेत मांडलं गेलं नाही तर ते उद्या राज्यसभेत मांडलं जाण्याची शक्यता देखील खूपच कमी आहे.
त्यामुळे उद्या शरद पवार यांचा पंतप्रधान मोदी यांच्यासोबत पुरस्कार प्रदान सोहळ्यात सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच उद्या शरद पवार राज्यसभेतील मतदानाला महत्व देणार की ते पंतप्रधान मोदी यांच्यासोबत पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार हा पेच निर्माण झाला. मात्र लोकसभेच्या कामकाज यादीत त्या विधेयकाचा समावेश नसल्याने हा पेच आता टळण्याची शक्यता आहे. दरम्यान सप्लिमेंटरी बिझनेस लीस्टमध्ये हे विधेयक नसल्यास तर मात्र हे विधेयक उद्या राज्यसभेत येण्याची कुठलीही शक्यता उरणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.