NCP Symbol Watch Time: राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हात 10 वाजून 10 मिनिटेच का दिसतात? वाचा भन्नाट किस्सा

नुकतेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 'तुतारी फुंकणारा माणूस' हे चिन्ह बहाल करण्यात आलं.
Sharad Pawar_NCP
Sharad Pawar_NCP
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या फूट पडलेली आहे. यामुळं राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष राहिलेले शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार हे आता वेगळे झाले आहेत. पण कायदेशीर लढाईनंतर आता पक्ष आणि चिन्ह घड्याळ हे अजित पवारांना बहाल करण्यात आलं आहे. तसेच नुकतेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 'तुतारी फुंकणारा माणूस' हे चिन्ह बहाल करण्यात आलं.

पण सुरुवातीला जेव्हा राष्ट्रावादीचं चिन्ह घड्याळ हे निश्चित झालं तेव्हा या घड्याळात १० वाजून १० मिनिटं झालेली दिसतात. पण राष्ट्रवादीच्या चिन्हामध्ये हीच वेळ का दाखवलेली असते. याचा एक भन्नाट किस्सा आहे, काय आहे हा किस्सा पाहुयात. (NCP Symbol Watch Time is only 10 hours and 10 oclock read amazing story behind it)

Sharad Pawar_NCP
'Turha' Sharad Pawar Party New Symbol: शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं निवडणूक चिन्ह; निवडणूक आयोगाची घोषणा

काँग्रेसला पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म

शरद पवारांच्या 'लोक माझे सांगाती...' या राजकीय आत्मचरित्रात शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हात १० वाजून १० मिनिटेच का झालेली दिसतात याचा खुलासा केला आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेसची मुहूर्तमेढ कशी रोवली गेली' या प्रकरणात शरद पवार म्हणतात, "पी. ए. संगमा, तारीक अन्वर आणि मला जेव्हा काँग्रेसनं सहा वर्षांसाठी निलंबित केलं. त्याचे परिणाम राज्यात आणि देशातही तीव्रतेनं उमटले. (Latest Marathi News)

यानंतर आता काँग्रेसला पर्याय दिला पाहिजे अशी सर्वांची तीव्र इच्छा होती. त्यामुळं काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतले लोक मुंबईत दाखल झाले आणि काँग्रेसला नवा पर्याय म्हणून 'राष्ट्रवादी काँग्रेस' पक्षाचा जन्म झाला. यासाठी 'चरखा' या चिन्हाची मागणीही झाली. त्यानंतर १७ जून १९९९ षण्मुखानंद हॉलमध्ये बैठक पडली, यावेळी पक्षाची घटना, कार्यकारिणीची मान्यता घेण्यात आली.

Sharad Pawar_NCP
VIDEO: धकधक गर्ल माधुरीसोबत थिरकली अंकिता लोखंडे; 'एक दो तीन' गाण्यावर केला जबरदस्त डान्स

पक्षाला मान्यता पण चिन्ह नाकारलं

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय जबाबदारी संगमा, तारीक अन्वर आणि माझ्यावर सोपवण्यात आली तर महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी छगन भुजबळांकडं देण्यात आली. पण जेव्हा निवडणूक आयोगाकडं पक्षाला मान्यता आणि चिन्ह चरख्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्यता दिली पण 'चरखा' हे चिन्ह द्यायला नकार दिला. दुसरं काहीही चिन्ह घ्या असं आम्हाला सांगितलं गेलं. (Marathi Tajya Batmya)

Sharad Pawar_NCP
Latest Marathi News : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

घड्याळात १० वाजून १० मिनिटे कशी?

पण जेव्हा षण्मुखानंद हॉलमध्ये आमची बैठक बोलावली होती तीची वेळ सकाळी १० वाजून १० मिनिटांची होती. ही वेळ दाखवणारं घड्याळ याच चिन्हाची पुढे मागणी झाली. हे चिन्ह निवडणूक आयोगानंही मान्य केलं, त्यानंतर लगेच लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यानंतर आमची एका नव्या दमानिशी नव्या संघर्षाला आणि वाटचालीली सुरुवात झाली, अशा शब्दांत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाची काहानी सांगितली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()