2020च्या कोरोना काळात दररोज 31 मुलांची आत्महत्या; NCRBचा धक्कादायक अहवाल

2020च्या कोरोना काळात दररोज 31 मुलांची आत्महत्या; NCRBचा धक्कादायक अहवाल
Updated on

नवी दिल्ली : कोरोना महासाथीचे अनेक परिणाम आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर झाले आहेत. ते परिणाम जसे दृश्य आहेत, तसेच काही अदृश्य देखील आहेत. काही परिणाम हे प्रत्यक्ष आहेत तर काही अप्रत्यक्ष आहेत. कोरोना काळात अनेकांना आपला जीव तर गमवावा लागलाच आहे, मात्र, ज्यांना कोरोनाची बाधा देखील झाली नसावी, अशावंर देखील कोरोना महासाथीचे एकूण परिणाम झालेले आहेत. अशांमधलाच एक महत्त्वाचा घटक म्हणजे लहान मुले... कोरोना महासाथीमध्ये लहान मुलांना कोरोना संक्रमणाचा सामना तितकासा करावा लागला नाहीये. मात्र, याचा अर्थ मुलांवर काहीच परिणाम झाला नाही, असं समजणं निश्चितचं गैर ठरेल. याबाबतच खुलासा करणारा एक अहवाल पुढे आला आहे. 2020 मध्ये प्रत्येक दिवशी सरासरी 31 लहान मुलांनी आत्महत्त्या केल्याचा धक्कादायक अहवाल पुढे आला आहे.

2020च्या कोरोना काळात दररोज 31 मुलांची आत्महत्या; NCRBचा धक्कादायक अहवाल
'ये कौन हैं भाई', नवाब मलिकांनी टि्वट केलेला फोटो कोणाचा?

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अर्थात NCRB ने ही आकडेवारी जाहीर केली आहे. कोरोना महासाथीच्या काळात लहान मुलांवर आलेल्या मानसिक ताणामुळे ही परिस्थिती ओढवल्याचं तज्ज्ञ सांगतात. NCRB च्या आकडेवारीनुसार, 2020 साली 11,396 लहान मुलांनी आत्महत्त्या केली आहे. 2019 साली 9,613 मुलांनी आत्महत्या केली होती. म्हणजे 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये तब्बल 18 टक्क्यांनी आत्महत्त्येच्या प्रमाणात वाढ झाल्याचं आकडेवारी सांगते. 2018 साली झालेल्या 9,413 आत्महत्त्यांशी तुलना करता 2020 साली 21 टक्क्यांनी मुलांच्या आत्महत्तेमध्ये वाढ झाल्याचं स्पष्ट होतंय.

2020च्या कोरोना काळात दररोज 31 मुलांची आत्महत्या; NCRBचा धक्कादायक अहवाल
श्रीमंत लीगमुळे T 20 World cup गेला; चाहत्यांनी काढला IPL वर राग

इतक्या कमी वयातच आत्महत्त्या करावीशी वाटणे, हे निश्चितच चिंताजनक आहे. लहान मुलांच्या अशा आत्महत्त्यांमागे कोणतं कारण असेल? NCRB च्या माहितीनुसार, 'घरातील अडचणी' हे या मुलांच्या आत्महत्त्येमागचे प्रमुख कारण असल्याचं नमूद करण्यात आलंय. कारण घरातील अडचणींमुळे 4006 आत्महत्त्या झाल्याचं अहवाल सांगतो. तर दुसरीकडे या आत्महत्त्यांमागे प्रेमप्रकरण हेदेखील कारण असून त्यामुे 1,337 आत्महत्त्या झाल्या आहेत. आजारपणाला कंटाळू देखील आत्महत्त्या असून 1,327 आत्महत्त्या या अशा कारणांमुळे झाल्या आहेत. ही तीन प्रमुख कारणे होतीच, याशिवाय इतरही काही कारणे आहेत. यामध्ये बेरोजगारी, दिवाळखोरी, वैचारिक मतभेद किंवा हिरो-वर्शिपींग, नपुसंकता किंवा वंध्यत्व तसेच मादक पदार्थांचे सेवन याचाही समावेश आहे.

याबाबत बोलताना सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेचे उपसंचालक प्रभात कुमार यांनी म्हटलंय की, लहान मुलांकडे आपण देशाच्या उभारणीसाठीचे मानवी भांडवल म्हणूनच पाहत असतो. त्यादृष्टीनेच आपण त्यांच्या शिक्षण, शरीरिक आणि आरोग्यासारख्या मूर्त गोष्टींमध्ये गुंतवणूक करतो. मात्र, त्यांच्या भावनिक, मानसिक अथवा सामाजिक आधाराबाबत अनेकदा मागे पडतो. मुलांच्या आत्महत्त्येमध्ये वाढ होण्यामागे हे कारण मुख्य आहे असं मला वाटतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.