NCRB Data : पुणे ठरलं देशातील दुसऱ्या क्रमांकाचं सुरक्षित शहर, कोलकता पहिल्या क्रमांकावर; ‘एनसीआरबी’ची माहिती

कोलकता हे देशात सर्वांत सुरक्षित शहर ठरले आहे. सलग तीन वर्षे कोलकताने प्रथम क्रमांक मिळवून ‘हॅट्‌ट्रिक’ साधली आहे.
NCRB Data Safest City
NCRB Data Safest CityeSakal
Updated on

Safest City in India : देशाची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी पुणे सुरक्षेबाबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकता हे देशात सर्वांत सुरक्षित शहर ठरले आहे. सलग तीन वर्षे कोलकताने प्रथम क्रमांक मिळवून ‘हॅट्‌ट्रिक’ साधली आहे.

राष्ट्रीय गुन्हा नोंद विभागाने (एनसीआरबी)यासंबंधीचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ‘भारतातील गुन्हेगारी २०२२’ या शीर्षकाचा अहवाल २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांकडून गोळा केलेल्या माहितीवर आधारित आहे.

अहवालानुसार, महानगरांमध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे दखलपात्र गुन्ह्यांची सर्वांत कमी नोंद कोलकत्यात झाली आहे. कोलकत्यात प्रति लाख लोकसंख्येत दखलपात्र गुन्हे ८६.७ नोंदविण्यात आले आहेत. पुण्यात हे प्रमाण २८०.७, हैदराबादमध्ये २९९.२ असे आहे. भारतीय दंडसंहिता (आयपीसी), विशेष आणि स्थानिक कायदे (एसएलएल) याअंतर्गत नोंदविले जाणारे गुन्हे हे दखलपात्र समजले जातात.

NCRB Data Safest City
Ayushman Bharat Yojana : ‘आयुष्मान भारत’मध्ये महिलांची सरशी; राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर तर हिंगोली सर्वांत पिछाडीवर

‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार २०२१ आणि २०२३ मधील दखलपात्र गुन्हे (एक लाख लोकसंख्येमागे)

  • कोलकता : १०३.४- ८६.७

  • पुणे : २५६.८ - २८०.७

  • हैदराबाद : २५९.९ -२९९.२

पुण्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी शहर पोलिस दलाकडून नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येत आहेत. महिलांच्या सुरक्षिततेबाबत आणि बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. सजग पुणेकर आणि पोलिसांच्या प्रयत्नांतून गुन्हेगारी घटनांवर प्रतिबंध करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.

- रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.