NCRB Report : वर्षभरात बलात्काराची 4 हजारहून अधिक प्रकरणं खोटी; पाच वर्षांत 55 टक्क्यांनी वाढ

बलात्काराची 4 हजारहून अधिक प्रकरणं खोटी असल्याचं आढळून आलं आहे.
Fake Rape Cases NCRB Report
Fake Rape Cases NCRB Reportesakal
Updated on
Summary

बलात्काराची 4 हजारहून अधिक प्रकरणं खोटी असल्याचं आढळून आलं आहे.

Fake Rape Cases : देशाच्या राजधानीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये (Ghaziabad) निर्भयासारखं क्रुरतेचं प्रकरण खोटं असल्याचं समोर आलंय. पण, खोटं असल्याचं समोर आलेलं हे एकमेव प्रकरण नाहीये. NCRB 2021 च्या अहवालानुसार, बलात्काराची 4 हजारहून अधिक प्रकरणं खोटी असल्याचं आढळून आलंय.

एवढंच नाही तर 11 हजारांहून अधिक महिलांचं बळजबरीनं अपहरण केल्याची प्रकरणंही पोलिस तपासात खोटी असल्याचं समोर आलंय. गेल्या 5 वर्षात बलात्काराच्या खोट्या घटनांमध्ये 55 टक्क्यांनी वाढ झालीय. एकीकडं गेल्या पाच वर्षांत बलात्काराच्या घटनांमध्ये घट झाली आहे. तर, पोलिसांच्या तपासात बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

Fake Rape Cases NCRB Report
Pakistan : माजी पंतप्रधान इम्रान खान यांना निवडणूक आयोगाचा मोठा झटका; 5 वर्षांसाठी ठरवलं अपात्र

NCRB च्या ताज्या अहवालानुसार, 2021 मध्ये पोलिसांनी 46,127 बलात्कार प्रकरणांचा तपास केला. यामध्ये 2021 सालातील 31,677 प्रकरणं, मागील वर्षांतील प्रलंबित आणि पुन्हा उघडलेल्या प्रकरणांचा समावेश आहे. पोलिस तपासानुसार, 2021 मध्ये 4,009 प्रकरणं बनावट असल्याचं आढळून आलं. चाचणी केलेल्या एकूण प्रकरणांपैकी 8.7 टक्के प्रकरणं बनावट असल्याचं आढळून आलंय.

Fake Rape Cases NCRB Report
HP Election : 4 टर्म आमदार असलेल्या उमेदवाराऐवजी भाजपनं चहावाल्याला दिली उमेदवारी

या आकडेवारीचा सखोल अभ्यास केल्यास खोट्या बलात्काराच्या घटना वाढत असल्याचं समोर आलंय. 2017 मध्ये एकूण 46,984 बलात्कार प्रकरणांची चौकशी सुरू होती. त्यापैकी 2,556 प्रकरणं खोटी असल्याचं घोषित करण्यात आलं. 2017 मध्ये खोट्या प्रकरणांची टक्केवारी 5.4 होती. अशाप्रकारे गेल्या पाच वर्षात जिथं बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली नसली तरी खोट्या बलात्काराच्या घटनांमध्ये मात्र 55 टक्क्यांनी वाढ झालीय.

Fake Rape Cases NCRB Report
Britain : पंतप्रधान पदासाठी ऋषी सुनक यांना 100 हून अधिक खासदारांचा पाठिंबा

एनसीआरबी अहवालातील महिलांवरील गुन्ह्यांची उर्वरित प्रकरणं पाहिल्यावर हा कल दिसून येतो. 2021 मध्ये महिलांविरोधातील 5.29 लाखांहून अधिक प्रकरणांची चौकशी करण्यात आली. यापैकी 5.8 टक्के (30,929) प्रकरणं खोटी असल्याचं आढळून आलं. पती आणि नातेवाईकांकडून हिंसाचाराची 3.6 टक्के (6,938) प्रकरणं, 9.1 टक्के (11,680) स्त्रीचं अपहरण आणि जबरदस्तीनं ताब्यात घेणं, 5.4 टक्के (6,764) तिच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या हेतूनं प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणं इत्यादी खोटी प्रकरणं समोर आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.