2024 मध्ये नितीश कुमार BJP चा खेळ बिघडवणार? आज निवडणूक झाल्यास NDA ला मोठा धक्का

Narendra Modi and Nitish Kumar
Narendra Modi and Nitish KumarPTI
Updated on

नवी दिल्ली : जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांनी एनडीएची साथ सोडून राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन केले. त्यामुळ भाजपला बिहारच्या सत्तेतून बाहेर पडाव लागलं. नितीश यांनी एनडीए सोडून भाजपला धक्का दिला आहे. मात्र २०२४ च्या निवडणुकीतही आपण भाजपला धक्का देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. त्यातच आता सी-व्होटरचा सर्व्हे आला असून त्यात भाजपला धक्का बसू शकतो. त्यामुळे नितीश कुमार २०२४ मध्ये खरच भाजपचा खेळ बिघडवू शकतात का, असा प्रश्न उपस्थित होतो. (Nitish Kumar alliance break news in Marathi)

Narendra Modi and Nitish Kumar
PM मोदींनी व्यंकय्या नायडूंची केली आचार्य विनोबा भावेंशी तुलना!

दरम्यान देशात आज लोकसभेची निवडणूक झाली तर देशात पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होईल, पण नितीश कुमार यांच्यासोबतची युती तुटल्याचा फटका त्यांना सहन करावा लागणार आहे. आजतक आणि सी व्होटरने केलेल्या मूड ऑफ द नेशन (MOTN) सर्वेक्षणात हा दावा करण्यात आला आहे.

Narendra Modi and Nitish Kumar
'रेवड्या' वाटण्यावरून केजरीवाल-केंद्र आमनेसामने

सर्वेक्षणानुसार 1 ऑगस्टपर्यंत लोकसभा निवडणुका झाल्या तर 543 जागांपैकी एनडीएला 307 जागा, यूपीएला 125 जागा मिळाल्या असत्या तर इतर पक्षांना 111 जागा मिळाल्या असत्या. मात्र बिहारमध्ये सरकार बदलल्यानंतर आता निवडणुका झाल्यास एनडीएला थेट 21 जागांचे नुकसान होईल. यामध्ये एनडीएला 286 यूपीएला 146 तर इतर पक्षांना 111 जागा मिळतील असं सर्वेक्षण सांगतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.