''भारताकडे पाच-सहा वर्षांत पहिले हायपरसॉनिक क्षेपणास्त्र असेल''

ब्रह्मोसच्या रौप्य महोत्सवी वर्ष उत्सवाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
BrahMos
BrahMos Sakal
Updated on

नवी दिल्ली : भारत-रशिया संरक्षण संयुक्त उपक्रम ब्रह्मोस (Brahmos) एरोस्पेस हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे बनविण्यास सक्षम असून, भारतात पाच ते सहा वर्षांमध्ये असे पहिले क्षेपणास्त्र असेल, अशी माहिती ब्रह्मोस एरोस्पेसचे सीईओ आणि एमडी अतुल राणे यांनी सोमवारी दिली आहे. ब्रह्मोसच्या रौप्य महोत्सवी वर्ष उत्सवाच्या (1998-2023) कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. (India Brahmos Missile News)

BrahMos
चीनला प्रत्युत्तर; फिलीपीन्स भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणार

भारताच्या (India) स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या अनुषंगाने, ब्रह्मोस एरोस्पेसने (Brahmos Aerospace) सोमवारी 'रौप्य महोत्सवी वर्ष' (2022-2023) समारंभास सुरुवात करण्यात आली. अजेय ब्रह्मोसच्या पहिल्या सुपरसॉनिक प्रक्षेपणाच्या (Supersonic Missile ) 21 गौरवशाली वर्षांच्या स्मरणार्थ 12 जूनपासून सुरू होणाऱ्या रौप्य महोत्सवी वर्षाची 12 फेब्रुवारी 2023 रोजी ब्रह्मोस स्थापना दिनी सांगता होणार आहे. दरम्यान, रौप्य महोत्सवी उत्सवादरम्यान JV संस्थेने अनेक प्रमुख कार्यक्रम, संमेलने आणि राष्ट्रीय-स्तरावरील स्पर्धांचे आयोजन केले आहे. (India Brahmos News In Marathi)

याअंतर्गत जगातील सर्वोत्कृष्ट सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र प्रणालीचे संचालन करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांच्या योगदानाची आणि व्यावसायिकतेबाबत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील तरुण प्रतिभेला दिशा देण्यासाठी 'अत्याधुनिक तंत्रज्ञान, क्षेपणास्त्रे आणि एरोस्पेस क्षेत्रातील वापर' या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

BrahMos
नौदलाला मिळाली पहिली P15B गाईडेड मिसाइल 'डिस्ट्रॉयर', आता होणार दमदार प्रहार

सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र भारतीय सशस्त्र दलाच्या तिन्ही सेवांमध्ये (2005 मध्ये भारतीय नौदलात; 2007 मध्ये भारतीय लष्करात; 2020 मध्ये भारतीय हवाई दलात) यशस्वीरित्या कार्यान्वित झाले आहे. 28 जानेवारी रोजी, ब्राह्मोस एरोस्पेसने फिलिपिन्सच्या नौदलाला अँटी-शिप ब्रह्मोस प्रणाली वितरीत करण्यासाठी फिलिपिन्ससोबत ऐतिहासिक करार केला. यामुळे कोट्यवधी डॉलर्सच्या ब्रह्मोस निर्यात करारामुळे पुढील काही वर्षांत जगातील सर्वोच्च लष्करी उत्पादक आणि निर्यातदार म्हणून उदयास येण्याच्या भारताच्या आकांक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.