Tunnel Collapsed: बचाव मोहिम अंतिम टप्प्यात! 21 जवानांच्या टीमचा बोगद्यात प्रवेश; घटनास्थळी 30 रुग्णवाहिकांची व्यवस्था

गेल्या १२ दिवसांपासून या बोगद्यात ४१ कामगार अडकून पडले आहेत.
Tunnel Collapsed
Tunnel Collapsed
Updated on

उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी इथल्या सिल्क्यारा बोगद्याचं काम सुरु असताना अचानक बोगद्याचा काही भाग कोसळल्यानं त्यात ४१ कामगार अडकून पडले. गेल्या १२ दिवसांपासून या कामगारांच्या बचावासाठी युद्धपातळीवर प्रशासनाचं काम सुरु आहे.

पण आता लवकरच त्यांना बाहेर काढण्यात यश येईल, कारण बचाव पथकातील काही जवानांनी या बोगद्यात प्रवेश केला आहे. (NDRF personnel enter Silkyara tunnel as operation to rescue 41 trapped workers intensifies in Uttarakhand)

बचाव मोहिम अंतिम टप्प्यात

बोगद्यात अडकून पडलेल्या ४१ कामगारांच्या बचावाची मोहिम आता अंतिम टप्प्यात आलं असून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची २१ जवानांच्या टीमनं ऑक्सिजन मास्कसह सिल्क्यारा बोगद्यात एका ट्युबच्या माध्यमातून प्रवेश केला आहे. एका ट्युबच्या माध्यमातून बोगद्याच्या वरच्या भागातून खोदण्यात आलेल्या बोगद्यामार्फत त्यांनी आतमध्ये प्रवेश केला आहे.

घटनास्थळी बचावकार्य तीव्र करण्यात आले असून गरज भासल्यास आपत्कालीन सेवा पुरवण्यासाठी घटनास्थळी सुमारे ३० रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

एएनआयशी बोलताना अॅम्ब्युलन्सचे तांत्रिक कर्मचारी बिसन सिंग पनवार म्हणाले, "आमच्याकडे रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध आहेत. कामगार बाहेर आल्यानंतर त्यांच्या महत्त्वाच्या अवयवांची तपासणी केली जाईल. आतापर्यंत एकूण ३० रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. ३० रुग्णवाहिकांपैकी , ८ अत्याधुनिक लाइफ सपोर्ट रुग्णवाहिका आणि 22 BLS रुग्णवाहिका आहेत. आम्हाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत कारण रात्रीपर्यंत बचाव कार्य पूर्ण होऊ शकते."

रुग्णालयात ४१ बेड सुसज्ज

दरम्यान, बचाव मोहिम यशस्वी झाल्यानंतर अडकलेल्या कामगारांना सुखरुप बाहेर आणल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. कारण गेल्या १२ दिवसांपासून हे लोक बोगद्यात अडकून पडले आहेत.

या ठिकाणी कमी ऑक्सिजन, सूर्यप्रकाशाचा अभाव, वातावरणातील बदल, धुळ, कीटक अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळं त्यांना वैद्यकीय निरिक्षणाखाली ठेवणं क्रमपात्र आहे.

आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत

अनेक उपाययोजना केल्यानंतरही अपयश येत असल्यानं अखेर आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञांची या बचाव मोहिमेसाठी मदत घेण्यात आली. त्यासाठी महाकाय अशा परदेशी मशिन्सही या ठिकाणी आणण्यात आल्या.

बोगदा तज्ज्ञ प्रा. आर्नोल्ड डिक्स हे या बचाव मोहिमेत लिडिंग एक्सर्प्ट म्हणून काम पाहत आहेत. तसेच या बचाव मोहिमेतून सर्व ४१ कामगारांना वाचवण्याची खात्री व्यक्त केली होती. यामध्ये कोणालाही इजाही होणार नाही आणि ते सुखरुप आपल्या घऱी परततील असा विश्वास त्यांनी कालच व्यक्त केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.