NEET Exam : ''नीट परीक्षेचा पेपर फुटलाच नाही'', केंद्र सरकारचा सुप्रीम कोर्टात दावा; 153 गैरप्रकार झाल्याचं NTA चं म्हणणं...

NTA : नीट परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून परीक्षेत एकूण 153 अनियमिततेचे प्रकरणे समोर आल्याचं म्हटलं आहे. समितीच्या शिफारशीवरु आधारित 81 उमेदवारांचे निकाल रोखण्यात आल्याचं कोर्टाला सांगण्यात आलंय.
NEET exam
NEET exam esakal
Updated on

Center Government on NEET Exam : नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचं मागच्या महिन्याभरापासून उघड होत आहे. या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे आहे. असं असतानाही केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र सादर करुन पेपरफुटी झाली नसल्याचा दावा केला आहे.

NEET परीक्षेमध्ये पेपरफुटीचा प्रकार झालाच नाही, असा दावा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात केला आहे. केंद्राने तसे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांमधील तफावत ही अभ्यासक्रम कमी केल्यामुळे आल्याचं केंद्राचं म्हणणं आहे.

२५ टक्के अभ्यासक्रम कमी केला म्हणून मार्क वाढल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. पेपरफुटीसंदर्भात IIT मद्रासची मदत घेण्यात आल्याचंही केंद्राने म्हटलं आहे.

NEET exam
Vidhan Parishad Election: पुन्हा गुवाहाटी? विधान परिषद निवडणुकीपूर्वी पक्षांना क्रॉस व्होटिंगची भीती, काय आहे समीकरण? दोन वर्षांपूर्वी...

दुसरीकडे नीट परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून परीक्षेत एकूण 153 अनियमिततेचे प्रकरणे समोर आल्याचं म्हटलं आहे. समितीच्या शिफारशीवरु आधारित 81 उमेदवारांचे निकाल रोखण्यात आल्याचं कोर्टाला सांगण्यात आलंय.

NEET exam
Manoj Jarange Patil: तीनशे बैलगाड्या, शेकडो वाहनं लाखोंचा जनसमूदाय... बीडमध्ये आज मराठ्यांचा एल्गार, वाचा कसं आहे शांतता रॅलीच नियोजन

तसेच 54 उमेदवारांना 3 वर्षांसाठी परीक्षेला बसण्यास अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे. टेलिग्रामवर पेपरफुटी झाल्याचा दावा खोटा असून फेक व्हिडीओ तयार करण्यात आल्याचं एनटीएन सांगितले आहे.

NEET प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नीट गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत ७ राज्यातून आरोपींना अटक, त्यामुळं ७ राज्यात पेपर लीक झाल्याची शंका आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (गुरुवार) NEET परीक्षेसंदर्भात दाखल याचिकांवर सुनावणी घेणार आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी पेपरफुटी कोणत्या स्तरावर झाली आहे आणि याचा गैरफायदा घेतलेल्या लोकांना ओळखणे शक्य आहे का, हे पाहणं महत्त्वाचे आहे.

त्यामुळे अनियमितता काही केंद्रांपुरती मर्यादित असेल आणि पेपरफुटी मोठ्या प्रमाणावर झाली नसेल, तर पुन्हा परीक्षा घेणे योग्य होणार नाही, असे न्यायालयाचे मत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मागच्या सुनावणीत न्यायालयाने एनटीए आणि केंद्राला काही मुद्यांवर उत्तरे दाखल करण्यास सांगितले होते. तसेच सीबीआयकडून स्टेटस रिपोर्टही मागवण्यात आला होता. आणि ज्यांनी पुन्हा परीक्षा घ्यावी अशी मागणी केली आहे त्यांना आपलं म्हणणं मांडण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. याशिवाय केंद्र सरकारने या संदर्भात नेमलेल्या समितीला देखील या प्रकरणात आपलं म्हणणं मांडण्याचे न्यायालयाने सांगितले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुन्हा घ्यायची की नाही? याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.