NEET paper Leak : बिहार नीट पेपरफुटी प्रकरणाचा मास्टरमाइंड 'रॉकी'ला अखेर अटक

Rakesh Ranjan alias Rocky arrested : आज रॉकीला पाटना येथील स्थानिक न्यायालयामध्ये हजर करण्यात आले असता त्याला दहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली
NEET paper Leak mastermind Rakesh Ranjan alias Rocky arrested bihar sent to 10 days CBI custody
NEET paper Leak mastermind Rakesh Ranjan alias Rocky arrested bihar sent to 10 days CBI custody
Updated on

पाटणा, ता. ११ ः बिहारमधील नीट- यूजी परीक्षेतील गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुख्य आरोपी राकेश रंजन (रॉकी) याला आज अटक केली. राजधानी पाटण्यातून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

आज रॉकीला पाटना येथील स्थानिक न्यायालयामध्ये हजर करण्यात आले असता त्याला दहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. रॉकीशी संबंधित पाटणा आणि कोलकात्यामधील काही ठिकाणांवरही छापे घालण्यात आले असता तपास संस्थेच्या हाती आक्षेपार्ह साहित्य लागले. रांचीमध्ये रॉकीच्या मालकीचे एक हॉटेल देखील आहे. ‘नीट’चा पेपर फुटल्यानंतर त्यानेच उत्तरपत्रिकेचा जुगाड केला होता अशी माहिती समोर आली आहे. धनबादमधून अमनसिंह याला अटक केल्यानंतर रॉकी तपास यंत्रणेच्या हाती लागला होता.

NEET paper Leak mastermind Rakesh Ranjan alias Rocky arrested bihar sent to 10 days CBI custody
Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात ‘वीजे’चा कहर! चोवीस तासांत ३८ जणांचा मृत्यू; दहा ते बारा जण जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.