Paper Leak: पंतप्रधानांकडून मागणी होत असताना राष्ट्रपतींनी केलं 'पेपर लीक'वर भाष्य; अभिभाषणात म्हणाल्या, स्वतंत्र चौकशी...

१८ व्या लोकसभेच्या कामकाजाला आता सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन्ही सभागृहाला संबोधित केलं.
Draupadi Murmu_PM Modi
Draupadi Murmu_PM Modi
Updated on

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणावरुन अवघा देश ढवळून निघाला आहे. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टानं देखील गंभीर दखल घेतली. पण अद्याप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावर भाष्य केलेलं नाही. पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आपल्या अभिभाषणात यावर भाष्य केलं आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांना एकत्रितरित्या संबोधित करताना त्यांनी या मुद्द्यावर सरकारच्यावतीनं भूमिका मांडली. (NEET Paper Leak President Draupadi Murmu commented during joint address in Parliament PM Modi still not commented)

राष्ट्रपती म्हणाल्या, "सरकारचा हा सातत्यानं प्रयत्न आहे की देशातील तरुणांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची योग्य संधी मिळावी. सरकारी भरती असो किंवा परीक्षा यांमध्ये कोणत्याही कारणानं जर अडथळे येणं हे योग्य नाही. यामध्ये सुसुत्रता आणि पारदर्शकता अत्यंत गरजेची आहे. अलिकडेच झालेल्या काही पेपरलीकच्या घटनांची निष्पक्ष चौकशी आणि दोषींना कडक शिक्षा देण्यासाठी माझं सरकार प्रतिबद्ध आहे. यापूर्वीही आपण पाहिलंय की अनेक राज्यांमध्ये पेपरलीकच्या घटना घडल्या आहेत"

Draupadi Murmu_PM Modi
Droupadi Murmu: काश्मिरी जनतेनं भारताच्या शत्रूंचा खोटा प्रचार हाणून पाडला; राष्ट्रपतींनी सांगितली सरकारची कामगिरी

यावर राजकारणापेक्षा वेगळा विचार करत त्यावर ठोस उपाय करण्याची गरज आहे. संसदेनं देखील परीक्षांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांविरोधात एक कठोर कायदा केला आहे. सरकार परीक्षांशीसंबंधित संस्था, त्यांच्या कामकाजाचे प्रकार, परीक्षा संबंधिची प्रक्रिया यामध्ये मोठी सुधारणा करण्याच्या दृष्टीनं काम करत आहे, असंही यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.