Supreme Court on NEET UG 2024: सर्वोच्च न्यायालयाने केलं मान्य.... NEET पेपर झाला लीक! पुन्हा परिक्षा घेण्यावर काय म्हणालं कोर्ट?

Supreme Court on NEET UG 2024: NEET पेपर संबधी कोर्टात दाखल झालेल्या 38 याचिकांवर एकाच वेळी सुनावणी झाली. त्यापैकी 34 याचिका विद्यार्थी, शिक्षक आणि कोचिंग संस्थांनी दाखल केल्या आहेत, तर 4 याचिका नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) दाखल केल्या आहेत. 50 हून अधिक पुनर्परीक्षेच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
NEET Exam
NEET ExamEsakal
Updated on

वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या NEET-UG 2024 मध्ये कथित पेपर लीकबाबत आज (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. फेरपरीक्षेच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, एक गोष्ट स्पष्ट आहे की पेपर लीक झाला आहे. प्रश्न असा आहे की, त्याची व्याप्ती किती मोठी आहे? पेपर फुटणे हे सर्वमान्य सत्य आहे. पेपर लीकबाबत आम्ही तपासत आहोत. केवळ दोन विद्यार्थ्यांचा हेराफेरीत सहभाग असल्याने तुम्ही संपूर्ण परीक्षा रद्द करू शकत नाही.

त्यामुळे लीकबाबत काळजी घेतली पाहिजे. पुन्हा परिक्षा घेण्यापूर्वी आम्हाला पेपर लीकची व्याप्ती जाणून घेणे आवश्यक आहे. कारण 23 लाख विद्यार्थ्यांच्या केसची आम्ही सुनावणी करत आहोत. पेपर लीकच्या आरोपींना ओळखण्यासाठी NTA आणि सरकारने आतापर्यंत काय पावले उचलली आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असंही न्यायालयाने यावेळी म्हटलं आहे.

NEET Exam
SC on Menstrual Leave: मासिक पाळीत रजा मिळण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, केंद्र आणि राज्यांना दिले 'हे' महत्त्वाचे आदेश

परीक्षा पुन्हा आयोजित करणे हा शेवटचा पर्याय असावा - न्यायालय

पेपर लीक किती विद्यार्थ्यांचे निकाल रोखण्यात आले, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने सरकारला केली. न्यायालयाने विचारले की हे विद्यार्थी कुठे आहेत? हे विद्यार्थी भौगोलिकदृष्ट्या कुठे आहेत? आम्ही अजूनही चुकीच्या लोकांचा मागोवा घेत आहोत आणि लाभार्थी ओळखू शकलो आहोत का? पुन्हा परीक्षा घेणे हा शेवटचा पर्याय असावा, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

या प्रकरणात जे काही घडले, त्याची देशभरातील तज्ज्ञांच्या समितीमार्फत चौकशी केली जावी असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालय पुढे म्हणाले की, प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीला आपल्या मुलांनी डॉक्टर किंवा अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावे असे वाटते. हे गृहीत धरून आम्ही परीक्षा रद्द करणार नाही आहोत. या फसवणुकीचा फायदा झालेल्यांची ओळख कशी होणार? आम्ही समुपदेशन होऊ देऊ का आणि आतापर्यंत काय झाले? असा सवाल देखील सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे.

NEET Exam
Nagpur Crime : पोलिसांना डांबून बालसुधारगृहातून तिघीजणी पळाल्या; वाहतूक पोलिसांनी पकडल्यावर धक्कादायक सत्य आलं समोर

NEET परीक्षा ५ मे रोजी झाली

विशेष म्हणजे कोर्टात दाखल झालेल्या 38 याचिकांवर एकाच वेळी आज सुनावणी पार पडली. त्यापैकी 34 याचिका विद्यार्थी, शिक्षक आणि कोचिंग संस्थांनी दाखल केल्या आहेत, तर 4 याचिका नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) दाखल केल्या आहेत. 50 हून अधिक पुनर्परीक्षेच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. NEET ची परीक्षा यावर्षी ५ मे रोजी झाली होती. 571 शहरांमधील 4,750 परीक्षा केंद्रांवर सुमारे 24 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली.

NEET Exam
Jharkhand Floor Test: एकही मत विरोधात न जाता हेमंत सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला; नेमकं काय घडलं?

मात्र या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर तो वादात सापडला आहे. पेपरफुटी आणि १५६३ विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी हेराफेरी आणि अनियमिततेचा आरोप केला होता. याविरोधात अनेक शहरांमध्ये निदर्शने झाली. विरोधी पक्षांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला. सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी राज्य उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.