NEET-UG 2024: नीट परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचे स्कोअर कार्ड होणार रद्द; सरकारची सुप्रीम कोर्टामध्ये माहिती

NEET-UG 2024: या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल, असं केंद्र सरकारने कोर्टात सांगितलं.
NEET UG 2024
NEET UG 2024esakal
Updated on

नवी दिल्ली- नीट-यूजी परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरु आहे. यावेळी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला महत्त्वाची माहिती दिली आहे. NEET-UG 2024 परीक्षेमध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या १५६३ विद्यार्थ्यांचे स्कोअर कार्ड रद्द केले जातील. तसेच या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल, असं केंद्र सरकारने कोर्टात सांगितलं.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट-यूजी परीक्षेमध्ये १५६३ विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क मिळाले आहेत. या विद्यार्थ्यांचे स्कोअर कार्ड रद्द करण्यात येतील. याशिवाय, या १५६३ विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याचा पर्याय दिला जाईल, असं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे.

NEET UG 2024
NEET Exam : परीक्षा, समुपदेशन रद्द नाही; सर्वोच्च न्यायालयाचे ‘नीट’बाबत अहवाल देण्याचे निर्देश

न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदिप मेहता यांचे सुट्टीकालीन बँच याप्रकरणी सुनावणी घेत आहे. याप्रकरणी अलख पांडे यांनी नीट परीक्षेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ग्रेस मार्कबाबत आक्षेप घेतला होता. याप्रकरणी त्यांनी याचिका दाखल केली होती. नॅशनल टेस्टिंग एजेन्सीने National Testing Agency (NTA) १५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिले होते.

NEET UG 2024
NEET Exam : NEET परीक्षेची सुरवात कधी झाली? ही परीक्षा घेण्याची गरज का वाटली?

पांडे यांनी याचिकेमध्ये म्हटलं होतं की, नीट परीक्षेदरम्यान घोटाळा झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी समिती स्थापन करुन चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. नीटच्या परीक्षेमध्ये तब्बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्ग मिळाले आहेत. त्यामुळे परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून त्यांनी आंदोलन केले आहे. पैकीच्या पैकी मार्ग घेतलेल्या विद्यार्थ्यांबाबत चौकशी करण्याची यावी अशी त्यांची मागणी आहे.

हरियाणाच्या फरिदाबादमधील एकाच केंद्रातील सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्ग मिळाले आहेत. त्यामुळे याप्रकरणी गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी कोर्टामध्ये दोन याचिका दाखल आहेत. मात्र, कोर्टाने एमबीबीएसची प्रवेश प्रक्रिया स्थगित न करण्याचा निर्णय घेतला आहे. नीट-यूजी परीक्षा ५ मे २०२४ रोजी घेण्यात आली होती. निकाल ४ जून रोजी जाहीर झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.