NEET प्रकरणातील मुख्य सूत्रधार 'असे' फोडायचा पेपर; इतर पाच पेपर फुटींमध्येही सहभाग

Paper Leak: उत्तर प्रदेश पोलीस परीक्षेचा पेपर लीक केल्याप्रकरणी एप्रिलमध्ये अटक करण्यात आलेल्या रवी अत्रीने सांगितले की, संजीव मुखिया हा परीक्षेचे पेपर लीक करण्यात "जुना खेळाडू" आहे.
Sanjeev Mukhiya Mastermind Behind NEET Paper Leak
Sanjeev Mukhiya Mastermind Behind NEET Paper LeakEsakal
Updated on

NEET-UG प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानला जाणाऱ्या संजीव कुमार मुखिया हा उत्तर प्रदेश कॉन्स्टेबल भरती परीक्षेसह पाच प्रमुख पेपर लीक प्रकरणांमध्ये सहभागी होता अशी माहिती तपास कागदपत्रांमधून मिळाल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

संजीव मुखियाची टोळी उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये कार्यरत असल्याचे कागदपत्रांवरून दिसत आहे.

बिहार शिक्षक भरती परीक्षा, हरियाणा पशुवैद्यकीय डॉक्टर भरती परीक्षा, हरियाणा इंग्रजी शिक्षक भरती परीक्षा, सीटीईटी आणि आरओ एआरओ परीक्षेतील पेपर लीक मागे ही टोळी होती.

उत्तर प्रदेश पोलीस भरतीचा पेपर आणि NEET-UG पेपर लीक करणारी टोळी मिळून काम करत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. उत्तर प्रदेश पोलीस भरती परीक्षा पेपर लीक प्रकरणाच्या तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींनी संजीव मुखियाचे नाव घेतले होते

Sanjeev Mukhiya Mastermind Behind NEET Paper Leak
Paper Leak: पंतप्रधानांकडून मागणी होत असताना राष्ट्रपतींनी केलं 'पेपर लीक'वर भाष्य; अभिभाषणात म्हणाल्या, स्वतंत्र चौकशी...

तपासाच्या कागदपत्रांमध्ये संजीव मुखिया टोळीची मोडस ऑपरेंडी आणि त्यांनी परीक्षेचे पेपर कसे लीक केले हे देखील उघड झाले आहे. मुखियाचा मुलगा डॉ.शिवकुमार उर्फ ​​बिट्टू हा देखील 'सोलव्हर गँग'चा भाग आहे.

संजीव मुखिया देशातील विविध परीक्षांमध्ये ब्ल्यूटूथ उपकरणे वापरून सॉल्व्हर्सना बसवायचा. मुखिया स्वतः दिल्लीत ब्लूटूथ उपकरणे खरेदी करण्यासाठी येत असे.

संजीव मुखियाच्या टोळीकडे असे तज्ज्ञ आहेत जे परीक्षेचे पेपर असलेले सीलबंद बॉक्स अशा प्रकारे फोडू शकतात की, त्यांनी केलेल्या छेडछाडीचा कोणालाही संशय यायचा नाही.

Sanjeev Mukhiya Mastermind Behind NEET Paper Leak
Viral Video: मृत्यू आला पण शेजारच्यालाही कळलं नाही, काम करता-करता 30 वर्षीय तरुणाला मृत्यूने गाठलं

उत्तर प्रदेश पोलीस भरती परीक्षेसाठी, संजीव मुखियाच्या टोळीचा सदस्य असलेल्या डॉ. शुभम मंडल याला पाटण्याहून अहमदाबादला परीक्षेचे पेपर असलेले बॉक्स फोडण्यासाठी पाठवण्यात आले होते.

उत्तर प्रदेश पोलीस परीक्षेचा पेपर लीक केल्याप्रकरणी एप्रिलमध्ये अटक करण्यात आलेल्या रवी अत्रीने सांगितले की, संजीव मुखिया हा परीक्षेचे पेपर लीक करण्यात "जुना खेळाडू" आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.