NEET UG Result 2023 Topper : प्रबंजन आणि वरुण NEET UG मध्ये अव्वल, येथे पहा संपूर्ण टॉपर्सची यादी

Doctor
Doctoresakal
Updated on

NEET UG Result 2023: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी NEET UG 2023 चा निकाल जाहीर केला आहे. माहितीनुसार, तामिळनाडूतील प्रबंजन जे आणि आंध्र प्रदेशातील बोरा वरुण चक्रवर्ती यांनी NEET परीक्षेत 99.99 टक्के गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. NTA कडून सांगण्यात आले की बहुतेक यशस्वी उमेदवार उत्तर प्रदेशातील आहेत. त्यानंतर महाराष्ट्र आणि राजस्थानचा क्रमांक लागतो.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी NEET UG 2023 चा निकाल जाहीर केला आहे. 20.38 लाखांपैकी एकूण 11.45 लाख उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक 1.39 लाख उमेदवार यशस्वी झाले आहेत. यानंतर महाराष्ट्रातून 1.31 लाख आणि राजस्थानमधून 1 लाखाहून अधिक उमेदवार यशस्वी झाले आहेत.

Doctor
Asaduddin Owaisi: "तुम्ही पाकिस्तानी मुस्लिमांना भाऊ मानता की नाही?" तरुणांच्या प्रश्नावर ओवैसी काय म्हणाले?

टॉपर्सची यादी -

  1. प्रबंजन जे – रँक-1, तामिळनाडू

  2. बोरा वरुण चक्रवर्ती - रँक-1, आंध्र प्रदेश

  3. कौस्तव बोरी - रँक 3, तामिळनाडू

  4. प्रांजल अग्रवाल, रँक-4, पंजाब

  5. ध्रुव अडवाणी, रँक 5, कर्नाटक

  6. सूर्य सिद्धार्थ, रँक 6, तामिळनाडू

  7. श्रीनिकेत रवी, रँक 7, महाराष्ट्र

  8. स्वयं शक्ती त्रिपाठी, रँक 8, ओडिशा

  9. वरुण एस, रँक 9, तामिळनाडू

  10. पार्थ खंडेलवाल, रँक 10, राजस्थान

NEET UG निकाल जाहीर होण्यास उशीर का?

मणिपूरमधील हिंसाचार आणि कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेऊन NEET UG परीक्षा 06 जून रोजी घेण्यात आली. एनटीएने 10 शहरांमधून उमेदवारांना परीक्षा देण्याची संधी दिली होती. सुमारे 8,700 उमेदवार परीक्षेला बसले होते. उशिरा परीक्षेमुळे मणिपूरच्या उमेदवारांसाठी NEET UG निकाल जाहीर होण्यास थोडा विलंब झाला.

Doctor
Mumbai News : मालाड स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड! ९० लोकल रद्द, तर २२०...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.