नेहरू-वाजपेयी लोकशाहीचे आदर्श : गडकरी

आम्ही आमच्या लोकशाहीच्या मर्यादा कधीही ओलांडणार नाही, असे ते मानायचे
nitin gadkari
nitin gadkarinitin gadkari
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (union minister nitin gadkari) यांनी दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) आणि अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) हे 'लोकशाहीचे आदर्श नेते' आहेत, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी सरकार आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना आत्मपरिक्षणाचा सल्ला देखील दिला आहे. नुकतेच संसदेचे पावसाळी अधिवेशन आटोपले आहे. त्यामध्ये घडलेल्या घडमोडींवर बोलताना गडकरींनी हे वक्तव्य केले आहे.

nitin gadkari
'भाजप'च्या तगड्या राणेंविरोधात सेनेच्या दोन वाघांची लागणार वर्णी?

वाजपेयी आणि नेहरू लोकशाहीचे आदर्श नेते होते. आम्ही आमच्या लोकशाहीच्या मर्यादा कधीही ओलांडणार नाही, असे ते मानायचे. अटलजी हे आमचे प्रेरणास्थान आहेत आणि पंडीत जवाहर लाल नेहरू यांचा भारतीय लोकशाहीमध्ये महत्वाचा वाटा आहे, असे एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये गडकरी म्हणाले.

संसदेच्या अधिवेशनामध्ये कृषी कायदे, इंधनाच्या वाढलेल्या किंमती, पेगॅसस हेरगिरी प्रकरण या मुद्यांवरून विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली होती. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ गदारोळ घालण्यात गेला. या अधिवेशनात महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होऊ शकली नाही आणि वेळेअगोदरच अधिवेशन आटोपतं घ्यावं लागलं, असेही ते म्हणाले.

जेव्हा अटलजींनी समजावलं...

महाराष्ट्र विधानसभेच विरोधी पक्षनेता असतनाच्या आठवणींना गडरींनी उजाळा दिला. त्यावेळी सभागृहाच्या कामाजात अडथळा आणण्यात मी पुढाकार घेत होतो. मात्र, त्याकाळात अटलजींशी माझी भेट झाली. लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचं वर्तन बरोबर नाही. योग्य पद्धतीने आपले म्हणणे जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असेही गडकरींनी सांगितले.

प्रबळ विरोधी पक्ष गरजेचा -

सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. मी पण पक्षाचा अध्यक्ष राहिलो आहे. आजचा सत्ताधारी पक्ष उद्या विरोधी असेल किंवा आजचे विरोधी उद्या सत्ताधारी असतील. आपल्या भूमिका नेहमी बदलत असतात. मी तर आयुष्यात अनेकवेळा विरोधात काम केले आहे. सर्वांनी लोकशाहीच्या मर्यादेचे पालन करणे गरजेचे आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रबळ विरोधी पक्ष असणे गरजेचे असते. नेहरूजी नेहमी अटलजींचा आदर करायचे आणि विरोधी पक्ष नेहमी गरजेचा असतो, असे म्हणायचे, असेही गडकरी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.