NMML Officially Renamed: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! नेहरू स्मारकाचे नाव बदलले, आता पंतप्रधान...

 NMML Officially Renamed
NMML Officially Renamed
Updated on

स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत नेहरू स्मारकाचे नाव बदलले आहे. यापुढे नेहरू स्मारकाला पंतप्रधान म्युझियम अँड लायब्ररी (PMML) म्हटले जाईल. स्वातंत्र्यदिनी नाव बदलण्याची औपचारिकता करण्यात आली आहे. नृपेंद्र मिश्रा हे पंतप्रधान म्युझियम आणि लायब्ररीच्या कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष आहेत.

नृपेंद्र मिश्रा यापूर्वी पंतप्रधान मोदींचे मुख्य सचिव होते. जून महिन्यात नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी सोसायटीच्या विशेष बैठकीत त्याचे नाव बदलून पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी असे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता त्याची औपचारिकता झाली आहे. (latest marathi news)

पीएमएलचे उपाध्यक्ष ए सूर्य प्रकाश यांनी एक्स (ट्विटर) वर नाव बदलल्याची पुष्टी केली. त्यांनी ट्विट केले की, "नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी (NMML) आता 14 ऑगस्ट 2023 पासून पंतप्रधानांचे संग्रहालय आणि ग्रंथालय (PMML) सोसायटी आहे, समाजाच्या कार्यक्षेत्रातील लोकशाहीकरण आणि विविधीकरणाच्या अनुषंगाने. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! जूनच्या मध्यात NMML सोसायटीच्या विशेष बैठकीत तिचे नाव बदलून PMML सोसायटी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

 NMML Officially Renamed
Satara-Pune highway : पुण्याला जाणारी वाहतूक खंबाटकी घाटातून वळवली; बोगद्यातील अँगल तुटला...


दरम्यान वृत्तसंस्था एनआयने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी सोसायटीचे नामकरण पंतप्रधानांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतल्याचे सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितले. 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सर्व पंतप्रधानांना समर्पित असलेले एक संग्रहालय तीन मूर्ती संकुलात उभारण्याची कल्पना मांडली होती.

NMML च्या कार्यकारी परिषदेने 25 नोव्हेंबर 2016 रोजी 162 व्या बैठकीत याला मान्यता दिली. आता हा प्रकल्प पूर्ण झाला असून 21 एप्रिल 2022 रोजी पंतप्रधानांचे संग्रहालय लोकांसाठी खुले करण्यात आले.

 NMML Officially Renamed
Mumbai News: इन्स्टाग्रामवर पाकच्या स्वातंत्र्यदिनाचं ठेवलं स्टेटस, दोन विद्यार्थ्यांना मुंबईत अटक!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()