Crime News : पाळीव कुत्र्यावरुन वाद ! घरासमोर येताच फेकलं अ‍ॅसिड अन्...

Crime News
Crime News
Updated on

नवी दिल्ली : पाळीव कुत्र्यावरून झालेल्या वादातून दिल्लीत धक्कादायक घटना झाली आहे. पीडित व्यक्तीच्या मुलाने त्यांच्या पाळीव कुत्र्याला आरोपीच्या घरासमोर फिरायला नेल्यामुळे झालेल्या भांडणानंतर शेजाऱ्यांने अ‍ॅसिड हल्ला केला आहे. या हल्ल्यात पीडित व्यक्तीला दुखापत झाली आहे. दिल्लीतील उत्तम नगर परिसरात शनिवारी पोलिसांनी सांगितले. (Neighbours attack man with acidic substance after quarrel over pet dog in Delhi)

Crime News
Indian Army Day 2023: भारतीय सैन्यासाठी चालू वर्ष असणार वैशिष्टपूर्ण; ताफ्यात सहभागी होणार खास शस्त्र

अ‍ॅसिड हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव राजेश्वर असून तो उत्तम नगर येथील रहिवासी आहे. त्याच्यावर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, "रात्री 10:00 वाजता उत्तम नगर पोलिस स्टेशनमध्येच्या हद्दीत भांडण झाल्याची तक्रार दाखल आली. भांडणात अ‍ॅसिड पदार्थाचा वापर करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Crime News
Maharashtra Kesari: "कुठलीही माघार कायमची माघार नसते"; अजित पवारांनी केलं शिवराज राक्षेचं अभिनंदन

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पीडित राजेश्वर यांचा मुलगा त्यांच्या पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन जात होता, जेव्हा ते आरोपीच्या घरासमोर पोहोचले, तेव्हा घरातील रहिवाशांनी शिवीगाळ सुरू केली, ज्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर पीडित व त्याच्या मुलावर घरातील रहिवाशांनी अ‍ॅसिड फेकला.

पीडित राजेश्वर यांचा मुलगा अभिषेक कुमारने एएनआयला सांगितले की, तो त्याच्या पाळीव कुत्र्याला घेऊन जात होता. तो शेजाऱ्यांच्या घरासमोर पोहोचताच घरातील रहिवाशांनी त्याला शिवीगाळ करून दगडफेक करण्यास सुरुवात केली. यानंतर, त्याच्या मदतीला धावून आलेल्या त्याच्या वडिलांनी घटनेची माहिती घेतली. त्यानंतर भांडण इतके वाढले की आरोपींपैकी एकाने अ‍ॅसिडची बाटली आणली. ती त्याच्या वडिलांच्या डोक्यावर मारली. ज्यामुळे डोक्याला दुखापत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.