योगाभ्यासाचं मूळ नेपाळमध्ये भारतात नव्हे; पंतप्रधान ओलींचा दावा

ओलींच्या या दाव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
kp oli sharma
kp oli sharma
Updated on

काठमांडू : जगभरात आज सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिवस (Internation Yoga Day) साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या एका दाव्यामुळं वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. योगाभ्यासाचं मूळ हे भारतातील नसून नेपाळमधील आहे, असा दावा त्यांनी केला आहे. नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (KP Sharma Oli claims yoga originated in Nepal)

ओली यांनी म्हटलं की, "देश म्हणून भारत अस्तित्वात येण्यापूर्वीच नेपाळमध्ये योगाभ्यास केला जात होता. त्यामुळे याचं मूळ हे भारतात नसून नेपाळमध्ये आहे. सध्या भारतात असलेल्या उत्तराखंडच्या भागात या योगाभ्यासाचा उदय झाला होता. आम्ही कधीही आमच्या ऋषींना याचं श्रेय दिलं नाही ज्यांनी योगाभ्यासाचा शोध लावला. आम्ही कायम या विषयावर आणि त्यांच्या योगदानावर चर्चा करत राहिलो कधीही योगाभ्यासावर योग्य प्रकारे दावा करु शकलो नाही. आम्ही याला कधीही जगभरात पोहोचवू शकलो नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाभ्यासाला जगात मान्यता मिळवून दिली. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून तो साजला केला जात आहे.

kp oli sharma
कोरोना रोखण्यासाठी दोन भिन्न लशी प्रभावी; WHOच्‍या शास्त्रज्ञांचा दावा

यापूर्वी ओली यांनी दावा केला होता की प्रभू रामाचा जन्म नेपाळमध्ये झाला होता. याच दाव्याचा आजच्या कार्यक्रमात त्यांनी पुनरुच्चार केला. रामाच्या जन्मस्थळाचा दावा करताना ओलींनी म्हटलं होतं की, प्रभू रामाचा जन्म नेपाळमधील चितवन जिल्ह्यातील अयोध्यापुरीत झाला होता. भारतातील अयोध्येत नव्हे. त्याचबरोबर त्यांनी नेपाळमध्ये राम, लक्ष्मण आणि सीतेचं भव्य मंदिर बांधण्याचे आदेशही दिले होते. अयोध्यापुरी नेपाळमध्ये होती, वाल्मिकी ऋषी देखील याच जिल्ह्यातील होते. सीतेचा मृत्यूही नेपाळमधील देवघाट येथे झाला होता असा दावाही त्यांनी केला होता. हे देवघाट अयोध्यापुरी आणि वाल्मिकी आश्रमाजवळ आहे.

kp oli sharma
कोविडच्या संकटामुळं अमरनाथ यात्रा यंदाही रद्द!

ओली पुढे असेही म्हणाले की, "आयुर्वेदाचा अभ्यास आणि शोध लावणाऱ्या अनेक ऋषींचा जन्म हा नेपाळमध्ये झाला होता. बनारसमधून हिमालयातील औषधी वनस्पतींचा अभ्यास करता येत नाही. अनेक आयुर्वेदिक औषधींवर नेपाळमध्ये संशोधन केलं गेलं त्यानंतर ते वाराणसीला नेलं."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.