इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याचा भाचा ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटकेत; खलिस्तानी संघटनेशीही संबंध

 arrested
arrested esakal
Updated on

नवी दिल्ली : न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये नुकत्याच झालेल्या ड्रग्ज बस्टच्या तपासात असे दिसून आले की ड्रग्ज विक्रीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला संशयित माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकर्‍याचा नातेवाईक आहे.

 arrested
Bihar News : विषारी दारू प्यायल्याने 6 जणांचा मृत्यू, 12 जणांची प्रकृती चिंताजनक

न्यूझीलंड पोलिसांनी या वर्षी मार्चमध्ये दक्षिण ऑकलंडच्या उपनगरातील मनुकाऊ येथील स्थानिक मालमत्तेवर छापा टाकला होता. यावेळी ड्रग्जची बिअर कॅनच्या पॅलेटमध्ये कोम्बुचा बाटल्यांची शिपमेंट जप्त केली होती.

न्यूझीलंड हेराल्डमधील एका वृत्तानुसार, न्यूझीलंड पोलिसांनी सांगितले की ऑकलंड शहराचे संघटित गुन्हे युनिट शिपमेंटची चौकशी करत होते ज्यामुळे मार्चच्या सुरुवातीला रायन प्लेस, मॅनुकाऊ येथे शोध वॉरंट लागू करण्यात आले. त्यात म्हटले की अधिकाऱ्यांनी बिअरच्या कॅनमध्ये लपवून ठेवलेले 328 किलो मेथॅम्फेटामाइन आढळून आले होते.

What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

पोलीस तपासात बलतेज सिंग याला अटक करण्यात आली, जो सतवंत सिंग याचा पुतण्या आहे. ऑपरेशन ब्लूस्टारनंतर ऑक्टोबर 1984 मध्ये सतवंत सिंग आणि सहकारी अंगरक्षक बेअंत सिंग यांनी इंदिरा गांधींची हत्या केली होती. सतवंत सिंग यांचा भाऊ आणि त्याचे कुटुंब 1980 च्या दशकात न्यूझीलंडमध्ये स्थलांतरित झाले होते. त्यांनी ऑकलंडमध्ये एक लहान किराणा दुकान सुरू केले. सतवंत सिंग यांचा पुतण्या असल्याबद्दल स्थानिक गुरुद्वारांनी अनेकदा बलतेजचे कौतुक केले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बलतेज सिंग हा न्यूझीलंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारतविरोधी आणि खलिस्तान समर्थक निदर्शनांचा प्राथमिक सूत्रधार आणि निधी उभारणारा म्हणून ओळखला जातो. बलतेज सिंग सध्या तुरुंगात असून त्याच्यावर अंमली पदार्थांच्या तस्करीचा खटला सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.