Net Worth Of Raw Agents : देशाची गुप्तचर यंत्रणा असणाऱ्या रॉ एजंट्सना किती असतो पगार? मिळतात या सवलती

देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाची असते ही गुप्तचर यंत्रणा.
Net Worth Of Raw Agents
Net Worth Of Raw Agentsesakal
Updated on

Net Worth Of Raw Agents : राजी, पठाण आणि अशाच बऱ्याच सिनेमांच्या माध्यमातून आपल्याला रॉ एजंट्स ही संकल्पना पुसटशी माहित झालेली असेलच. रिसर्च अँड अॅनालिसिस विंग एजंट म्हणजे RAW एजंट हे कोण असतात आणि त्यांचं काय काम असतं हे आपल्यापैकी बहुतांश लोकांना माहिती आहे. ही भारताची गुप्तचर यंत्रणा असते जी भारतावर येणाऱ्या संकटांवर नजर ठेवून त्याची माहिती गुप्तचर विभागाला किंवा सैन्याला देतात.

देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाची असणाऱ्या यंत्रणे विषयी फार गुप्तता पाळली जाते. त्यामुळे या रॉ एजंट्सला किती पगार असतो, त्यांना काय सुविधा मिळतात याविषयी बऱ्याच जणांना उत्सुरकता असते.

RAW एजंट्सकडे हे स्किल्स असणं आवश्यक

  • उमेदवाराने दीर्घ कालावधीसाठी काम केले पाहिजे.

  • उमेदवाराकडे जास्त अंतराचा प्रवास करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

  • उमेदवाराकडे मूलगामी आणि तार्किक विचार असणे आवश्यक आहे.

  • उमेदवाराने लवकर निर्णय घ्यावा.

  • उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे जेणेकरून तो/ती सर्व शारीरिक क्रियाकलाप करू शकेल.

  • उमेदवाराने नेहमी प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची तयारी ठेवावी.

  • उमेदवार अत्यंत गुप्त असणे आवश्यक आहे.

  • उमेदवार अंतर्ज्ञानी आणि चपळ असावा.

Net Worth Of Raw Agents
Raw Agent Ajit Doval : ऑपरेशन ब्लु स्टारमध्ये रॉ एजेंट अजित डोवाल गुप्तचर नसते तर...

एवढा मिळतो पगार

  • अनुभव आणि बॅग्राउंडनुसार रॉ एजंट्सना ८० हजार ते १०३ लाख रुपयांपर्यंत मासिक वेतन असते.

  • दर वर्षी साधारण ९ लाख ६० हजार रुपये ते १५ लाख ६० हजार रुपयांपर्यंतचं पॅकेज या एजंट्सचं असतं.

Net Worth Of Raw Agents
RAW : थेट Narendra Modi ना रिपोर्ट करणाऱ्या रॉ चा इतिहास माहितीये?

या सवलती मिळतात

  • रॉ एजंटला सुरक्षा भत्ते मिळतात. जे मूळ वेतन, एकूण उत्पन्न आणि महागाई भत्त्यांपेक्षा जास्त असतात.

  • प्रत्येक आर्थिक वर्षात २ महिने अतिरीक्त वेतन मिळते.

  • परदेशात मिशनसाठी नियुक्त केलेल्या रॉ कर्मरचाऱ्यांना परदेशी सेवा भत्ता आणि DA मिळतो.

  • विभागाद्वारे हार्डशिप पोस्टिंग म्हणून वर्गीकृत केलेल्या पोस्टिंगला कष्ट भत्ता मिळतो.

  • रॉ अधिकारी त्यांच्या मुलांनी चांगले शिक्षण देण्यासाठी सिंगापूर, अमेरिका किंवा युरोपियन देशात नियुक्त करू शकतात.

  • रॉ एजंटच्या मुलांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठ किंवा शाळेत प्रवेश मिळू शकतो. आणि एजंसी खर्चाची सर्व काळजी घेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.