Netaji Subhash Chandra Bose : स्वातंत्र्या पूर्वी ६ जुलै १९४४ ला रेडीयो रंगून वरून महात्मा गांधींना नवं नाव देण्यात आलं. ते म्हणजे राष्ट्रपिता. गांधीजींसाठी या सर्वोच्च सन्मानीय शब्दाचा वापर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केला होता. यामुळे गांधींच नाव इतिहासात याच शब्दाने नोंदवलं गेलं.
असं सांगितलं जातं की, नेताजी आणि गांधी हे एकमेंकांचा फर सन्मान करायचे. पण तरीही दोघांमध्ये काही मुद्द्यांना घेऊन मतभेद होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यात आणि महात्मा गांधी यांच्यातले वाद केवळ तात्विक होते. हे मतभेद होते मनभेद नाही हे सिध्द करणारा प्रसंग.
नेताजींचं म्हणणं होतं की, अहिंसेच्या मार्गावर चालून स्वातंत्र्य मिळू शकतं असं नाही. अहिंसा ही एक विचारधारा असू शकते पण तो पंथ नाही. राष्ट्रीय आंदोलन हिंसामुक्त असणं चांगलंच आहे, पण वेळ प्रसंगी शस्त्रपण उचललेच जायला हवेत असं त्यांचं मत होतं.
तर याच्या उलट गांधीजींच मत होतं की, त्यांना वाटत की, अहिंसा हाच देशाला स्वतंत्र करण्याचा एकमेव मार्ग आहे. गांधीजींनी आपल्या अनेक अहिंसा आंदोलनांनी इंग्रजांना बऱ्याचदा वाकवलं आहे.
राष्ट्रपिता ही घोषणा अधिकृतरित्या नाही
देशातले लोक गांधीजींना राष्ट्रपिता म्हणत असले तरी सरकारी पातळीवर याची अधिकृत घोषणा झालेली नाही. संविधानुसार ते शक्य नाही. म्हणूनच गृह मंत्रालयाने लखनौच्या बाल आरटीआय कार्यकर्ती ऐश्वर्या पाराशरला दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे की, महात्मा गांधींना राष्ट्रपिता घोषित करण्यासंदर्भात कोणतीही अधिसुचना दिली जाऊ शकत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.