नेटफ्लिक्सवर (Netflix) चित्रपट पाहण्याची सवय असेल तर तुमचे टेन्शन चांगलेच वाढणार आहे. कारण, काही देशांमध्ये नेटफ्लिक्स सदस्यता योजना महाग करण्यात आल्या आहेत. कंपनीने अमेरिका आणि कॅनडामध्ये दर वाढवले (prices of monthly and annual plans went up) असताना अलीकडेच भारतातील मासिक आणि वार्षिक योजनांच्या किमती कमी (Lower rates in India) केल्या आहेत.
कंपनीने यूएसमधील मासिक सदस्यता (सब्सक्रिप्शन) किमती योजना ७४ रुपयांवरून १४८ रुपये केली आहे. नवीन सदस्यांना आकर्षित करण्यासाठी नेटफ्लिक्सने (Netflix) भारतात सदस्यता योजनांच्या किमती कमी केल्या आहेत. नेटफ्लिक्सने भारतात मोबाइल प्लॅनची किंमत १९९ रुपयांवरून १४९ रुपये केली आहे. यामुळे भारतीयांना दिलासा मिळाला आहे.
अमेरिका
यूएसमधील बेसिक प्लॅन जो एका वेळी फक्त एक स्क्रीनला अनुमती देते त्याची किंमत ७४३ रुपये आहे. स्टँडर्ड प्लॅनची किंमत प्रति महिना अंदाजे १,०४१ वरून १,१५३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. मासिक योजना एकावेळी दोन स्क्रीनला अनुमती देते. ४K प्लॅनची किंमत प्रति महिना १,३३९ वरून अंदाजे १,४८८ रुपयांपर्यंत वाढेल. ही योजना एकावेळी चार स्क्रीन्सना अनुमती देते. मूलभूत योजनेची किंमत देखील ७४ रुपयांनी वाढली आहे.
कॅनडा
नेटफ्लिक्सने कॅनडामध्ये सबस्क्रिप्शन प्लॅनच्या किमतीही वाढवल्या होत्या. कॅनडामध्ये मासिक योजना C$१४.९९ वरून C$१६.४९ पर्यंत वाढवल्या आहे. प्रीमियम योजना C$२ वरून C$२०.९९ पर्यंत वाढवली आहे. नेटफ्लिक्सने बेसिक प्लॅनची किंमत वाढवलेली नाही. ती पूर्वीसारखी C$९.९९ आहे.
भारत
नेटफ्लिक्सने (Netflix) भारतात मोबाइल प्लॅनची किंमत १९९ रुपयांवरून १४९ रुपये केली आहे. मोबाइल प्लॅन वापरकर्त्यांना ४८०p वर फोन आणि टॅब्लेटवर व्हिडिओ स्ट्रीम करू देतो. बेसिक प्लॅन वापरकर्त्यांना एकावेळी एकाच मोबाइल, टॅब, कॉम्प्यूटर आणि टीव्हीवर व्हिडिओ प्रवाहित करण्याची परवानगी देते. सध्या त्याची किंमत १९९ रुपये आहे. हा प्लॅन आधी ४९९ रुपयांचा होता. वापरकर्त्यांना एचडी व्हिडिओ स्ट्रीम करू देणारी मासिक सदस्यता योजना भारतात ४९९ रुपये आहे. ही योजना वापरकर्त्यांना एकाच वेळी दोन भिन्न उपकरणांवर व्हिडिओ प्रवाहित करू देते. स्टँडर्ड प्लॅनची किंमत आधी ६४९ रुपये होती. प्रीमियम प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनची किंमत आधी ७९९ रुपये होती ती आता ६४९ रुपये झाली आहे. प्रीमियम योजना वापरकर्त्यांना ४K+HDR मध्ये व्हिडिओ ब्राउझ करू देते. प्रीमियम प्लॅन वापरकर्ते एकाच वेळी चार वेगवेगळ्या उपकरणांवर स्ट्रीमिंग करू शकतात.
दर्जेदार मनोरंजन पर्याय देत राहू
आम्ही किमतीत बदल केलेला आहे. याद्वारे आम्ही विविध दर्जेदार मनोरंजन पर्याय देत राहू. नेहमीप्रमाणे आम्ही अनेक योजना ऑफर करतो. जेणेकरून सदस्य त्यांच्या बजेटसाठी योग्य किंमत निवडू शकतील, असे नेटफ्लिक्सचे प्रवक्ता रॉयटर्स यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.