बडोदा : देशभरात कोरोनाचा कहर सुरू असतानाच आता गुजरातमधील बडोद्यात जुळ्या नवजात बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील वडोदरा येथे जुळ्या नवजात बालकांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. अतिसार आणि पाण्याचं प्रमाण कमी असल्याने या बालकांना जन्मानंतर १५ दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यावेळी या दोन्ही बालकांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. सध्या या बालकांची प्रकृती चांगली आहे, पण त्यांना अजून डिस्चार्ज दिलेला नाही, अशी माहिती एसएसजी हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉ. अय्यर यांनी दिली.
गुरुवारी गुजरातमध्ये दिवसभरात कोरोनाचे २४१० नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील संक्रमित लोकांची संख्या ३,१०,१०८वर पोचली आहे. तसेच गेल्या २४ तासात कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ४५२८ एवढी झाली आहे. २०१५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत गुजरातमधील २,९२,५८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती गुजरात राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सूरतमध्ये चार, अहमदाबादमध्ये तीन, बडोदा आणि भावनगरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादमध्ये कोरोनाचे सर्वाधिक ६२६ रुग्ण आढळले आहेत. सूरतमध्ये ६१५, बडोद्यात ३६३, तर राजकोटमध्ये २२३ नव्या केस नोंदवल्या गेल्या आहेत.
सध्या गुजरातमध्ये १२,९९६ रुग्ण उपचार घेत आहेत त्यापैकी १५५ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३५ टक्के आहे. ६०,६५,६८२ लोकांनी कोरोनाची लस घेतली असून त्यापैकी ६,९७,२८० जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.