बंगळूर : कर्नाटकात भाजपमधील अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (CM Yediyurappa) यांना पदावरुन हटवले जावे, अशी पक्षातूनच मागणी आता जोर धरु लागलीय. याच पार्श्वभूमीवर येडियुरप्पा यांची या महिन्याच्या अखेरीस उचलबांगडी करण्यात येईल, अशी भविष्यवाणीच भाजप प्रदेशाध्यक्षांच्या एका ऑडिओ क्लिपव्दारे व्हायरल झाल्याने खळबळ उडालीय. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटिल (Karnataka BJP chief Nalin Kumar Kateel) यांची 47 सेंकदांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने कर्नाटकात येडियुरप्पांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. (New Chief Minister Of Karnataka Will Be On July 28 Karnataka Political News bam92)
कर्नाटक राज्याचे भाजपप्रमुख कटिल यांनी राज्यातील संभाव्य नेतृत्व बदलण्याचा इशारा दिल्याने कर्नाटकातील भाजप सरकार अस्थिर होण्याचा धोका निर्माण झालाय.
कर्नाटक राज्याचे भाजपप्रमुख कटिल (Karnataka BJP chief Nalin Kumar Kateel) यांनी राज्यातील संभाव्य नेतृत्व बदलण्याचा इशारा दिल्याने कर्नाटकातील भाजप सरकार अस्थिर होण्याचा धोका निर्माण झालाय. मात्र, या विधानावर माहिती देताना भाजपचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील यत्नाळ (BJP leader Basavaraj Patil Yatnal) यांनी (सोमवारी) सांगितले, की केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल. लवकरच यावर तोडगा निघणार असून राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. तो प्रामाणिक, हिंदुत्ववादी आणि भाजपाला पुन्हा सत्तेत आणण्यास सक्षम असेल, असेही त्यांनी स्पष्ट केलेय.
काय होती ऑडिओ क्लिप?
या ऑडिओ क्लिपमध्ये कटिल असे म्हणत आहेत, राज्यात नक्कीच नेतृत्व बदल होणार आहे. नवीन टीम राज्यात दिसणार आहे. मुख्यमंत्र्यांबाबतचा निर्णय दिल्लीतील नेतृत्वाने घेतला आहे. त्यांना या महिन्याच्या अखेरीस बदलण्यात येईल. कटिल यांच्या ऑडिओ क्लिपनंतर मोठा गदारोळ उडाला आहे. कटिल यांनी हा आवाज आपला नसल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्या ऑडिओतील आवाज माझा नाही, हे मी अनेकवेळा स्पष्ट केले. या प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. सत्य बाहेर यायलाच हवे. भूतकाळातही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी चौकशी व्हावी आणि सत्य बाहेर यावे.
येडियुरप्पा यांना नुकतेच पक्ष नेतृत्वाने दिल्लीला पाचारण केले होते. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही येडियुरप्पा यांनी भेट घेतली. या भेटीत येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी येडियुरप्पांनी प्रकृतीचे कारण पुढे केले होते. पक्षाच्या नेतृत्वाची भेट घेतल्यानंतर येडियुरप्पांना प्रसारमाध्यांनी राजीनाम्याबाबत विचारणा केली होती. यावर त्यांनी कुठला राजीनामा, असा प्रतिप्रश्न माध्यमांनी केला होता. ते म्हणाले होते, की मी पंतप्रधानांना विकासकामांबाबत भेटलो, त्यांच्याशी चर्चाही केली आहे. मी पुन्हा ऑगस्टमध्ये दिल्लीत परत येणार आहे. त्यामुळे राजीनाम्याच्या बातम्यांना अजिबात महत्व नाही.
राज्यातील नेतृत्व बदलाबाबत कोणताही चर्चा झालेली नाही. मला कुणीही राजीनामा देण्यास सांगितलेले नाही. उत्तराखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांना असेच अचानक दिल्लीत बोलावण्यात आले होते. नंतर त्यांनी राज्यात परत जाऊन थेट राज्यपालांकडे राजीनामा सोपवला होता. त्यानंतर पुष्करसिंह धामी उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री बनले होते. त्यामुळे कर्नाटकमध्ये उत्तराखंडची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. परंतु, पक्ष नेतृत्वा अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे सूत्रांनी दिली.
सध्या दिल्लीत असलेल्या कर्नाटकच्या तीन नेत्यांपैकी एकाला येडियुरप्पा यांच्या जागी मुख्यमंत्रिपदावर पाठविण्यात येणार असल्याचे केंद्राकडून सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप याची कोणतीच घोषणा झालेली नाही. शनिवारी दिल्लीहून परत आलेल्या येडियुरप्पा यांनी भाजप सरकारच्या उर्वरित दोन वर्षांच्या कार्यकाळात पदावर कायम राहण्यावर भर देण्याबाबत सोमवारी कोणतेही विधान जारी केले नाही. मात्र, माजी केंद्रीय मंत्री, उत्तर कर्नाटकातील विजापूरचे आमदार बसवराज पाटील यत्नाळ यांनी सांगितले, की मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. मात्र, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदीच राज्याला नवा मुख्यमंत्री देतील, जो प्रामाणिक, हिंदुत्वनिष्ठ आणि पुढच्या निवडणुकीत पक्षाला मुख्यमंत्रिपदावर आणण्यास सक्षम असा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकात 2023 मध्ये 'विधानसभा'
येडियुरप्पा हे लिंगायत समाजाचे नेतृत्व करतात. मात्र, पंचमसाली (Panchamsali) आणि मागासवर्गीय उप-जातींमधून येणाऱ्या यत्नाळ Yatnal यांचे नाव सध्या राज्याचा पुढचा मुख्यमंत्री होण्याच्या दृष्टीने महत्वाचे मानले जात आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी Pralhad Joshi, राज्य मंत्रिमंडळातील खाणउद्योग मंत्री मुरुगेश निराणी, भाजपाचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष आणि राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवि हे वोकलिगा समाजातील (Vokkaliga community) असल्याने त्यांचेही नाव चर्चेत आहे. परंतु, जर लिंगायत समाजातील नेते येडियुरप्पा यांची बदली म्हणून लिंगायत समुदायातील नेत्याबरोबर जाण्याचे निवडले असेल, तर उद्योगपती आणि राज्याचे खाण मंत्री मुरुगेश निराणी (Murugesh Nirani), युवा आमदार अरविंद बेलाड (MLA Arvind Bellad) (son of a veteran RSS and BJP leader) आणि यत्नाळ Yatnal यांच्या नावालाही प्राधान्य मिळत असल्याचेही दिसत आहे. काही आठवड्यांपूर्वी अरविंद बेलाड मुख्यमंत्री होण्याच्या अगदी जवळ होते, असे भाजपच्या एका सूत्रांनी सांगितले. 51 वर्षीय बेलाड यांच्यावर आठवड्यांपूर्वी फोन टॅप केल्याचा आरोप होता. मात्र, पोलिस चौकशीअंती त्यांच्यावरील कोणतेही आरोप सिध्द झाले नाहीत.
कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री 28 जुलैला..?
कर्नाटकमधील नेतृत्वबदलाला आता जोर आला आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी 22 जुलै रोजी मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे. भाजप सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 26 रोजी विधिमंडळ बैठक बोलावली असून भोजन समारंभही होणार आहे. त्याच दिवशी मुख्यमंत्री येडियुराप्पा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन राजीनामा सादर करणार असल्याची शक्यता आहे. तीन दिवसांआधी मुख्यमंत्री येडियुराप्पांनी दिल्ली दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यावेळी सूचना केली होती. त्यावेळी श्रेष्ठींनी येडियुराप्पांना पायउतार होऊन इतरांना संधी देण्याती सूचना केली होती.
त्यानुसार 26 रोजी होणाऱ्या समारंभानंतर दोनच दिवसांत राजीनाम्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे समजते. सोमवारी दिवसभर निकटवर्तीय मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची भेट घेत होते. त्यांच्या राजीनाम्याविषयी ते जाणून घेत होते. पत्रकारांशी संवाद साधताना मात्र सर्वजण राजीनाम्याचा विषयच नसल्याचे सांगत होते. पुढील दोन वर्षांनंतर (2023) विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी नेतृत्वबदल करणे सोपे नाही. याविषयी पक्षश्रेष्ठींनी कुठेही जाहीर केलेले नाही. शिवाय नेतृत्वबदलावर जाहीर विधाने करणाऱ्यांवर चाप लावलेला नाही. त्यामुळे श्रेष्ठींच्या मनात आहे तरी काय? असा प्रश्न राज्यातील राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार पदाचा राजीनामा देणार आहेत. पण, त्यांचे निकटवर्ती, समर्थक गप्प बसणार नाही निश्चित आहे.
पुढील मुख्यमंत्री कोण? सध्याच्या राजकीय घडामोडींनुसार मुख्यमंत्री येडियुराप्पा 28 रोजी राजीनामा देणार आहेत. त्यांच्यानंतर हे पद कुणाला मिळणार, याची घोषणा अद्याप झालेली नाही. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, राज्याचे उपमुख्यमंत्री अश्वत्थनारायण, राज्य मंत्रिमंडळातील खाणउद्योग मंत्री मुरुगेश निराणी, भाजपचे राष्ट्रीय मुख्य सचिव बीएल संतोष मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.
New Chief Minister Of Karnataka Will Be On July 28 Karnataka Political News bam92
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.