दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला मंगळवारी नवा मुख्यमंत्री मिळला आहे.
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणातून तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आम आदमी पार्टी विधिमंडळ पक्षाचे नवे नेते आणि दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
यावेळी अरविंद केजरीवाल व आपच्या आमदारांनी विधिमंडळ नेतेपदी अतिशी निवड केली. या निवडीनंतर अतिशी या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील हे स्पष्ट झाले आहे.
आम आदमी पार्टीने २६ आणि २७ सप्टेंबर रोजी दिल्ली विधानसभेचे अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात नव्या मुख्यमंत्र्यांचे पहिले भाषण होऊ शकते.