XBB Variant: कोरोनाचा घातक अन् वेगाने पसरणारा Variant, भारतातही शिरकाव, वाचा लक्षणं

आता हाँगकाँगमध्ये कोरोनाचा नवा व्हॅरिएंट आढळून आला आहे
XBB Varient
XBB Varientesakal
Updated on

New Variant: चीनसह अन्य देशांमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसून येतोय. माहितीनुसार कोविडचा आणखी एक घातक व्हॅरिएंट आढळून आला आहे. ज्याचे नाव आहे 'XBB Variant'. मागल्या आठवड्यापासून रूग्णसंख्येत वाढ झाल्याने शास्त्रज्ञही चिंतेत पडले आहे. तर युरोपीय देशाच्या शास्त्रज्ञांनी आणखी एक कोरोना लहर येण्याचे संकेत दिले आहेत. त्यातच आता हाँगकाँगमध्ये कोरोनाचा नवा व्हॅरिएंट आढळून आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार हाँगकाँगमध्ये कोविड १९चा सब व्हॅरिएंट XBB आढळून आला. या व्हॅरिएंटवर व्हॅक्सिनचाही प्रभाव दिसून येत नाही. मानवी प्रतिकारशक्तीलाही मात देत हा व्हॅरिएंट संसर्ग वेगाने पसरवणारा दिसून येतो. शास्त्रज्ञांच्या मते या व्हरिएंटमुळे अनेक देशांमध्ये परिस्थिती बिघडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे हा नवा व्हरिएंट नेमका काय आहे आणि याची लक्षणं कशी आहेत ते जाणून घेणं महत्वाचं ठरतं.

भारतात तमिळनाडूमध्ये XBBचे रूग्ण आढळून आले. तसेच महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तमिळनाडूमध्ये नव्या व्हॅरिएंटच्या रूग्णांची नोंद केल्या गेली. या सगळ्या भागांमध्ये एकूण ६७ रूग्ण आढळून आले.

काय आहेत लक्षणे?

अनेक संक्रमितांमध्ये साधारण लक्षणं बघितल्या गेली.

ताप

गळ्यात खरखर वाटणे

तसेच थंडीच्या दिवसांत विशेष काळजी घ्यावी.

XBB Varient
Corona Update : मुंबईत आज दिवसभरात १३२ नवीन रुग्णांची नोंद

याचे काही रूग्ण रूग्णालयात भर्ती न होताच बरे होताय तर काही रूग्णांना गंभीर समस्या उद्भवल्याने रूग्णालयात भर्ती व्हावे लागले. शास्त्रज्ञांच्या मते, थंडीच्या दिवसांत नव्या व्हरिएंटचे रूग्ण वाढण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()