देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर १४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवसी झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावले त्यांना देशवासीयांनी आज आदरांजली अर्पण केली.
नवी दिल्ली - देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर १४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवसी झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावले त्यांना देशवासीयांनी आज आदरांजली अर्पण केली. या हल्ल्याचे सूत्रधार जे आजही विदेशात दडून बसले आहेत त्यांना कायदयाच्या चौकटीत आणून त्वरित कठोर कारवाई करावी असे आवाहन भारताने पाकिस्तानचा नामोल्लेख न करता केले आहे. याच दिवशी पाकिस्तानातून मुंबई शहरात सागरी मार्गाने घुसलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ परदेशी नागरिकांसह १६६ लोकांचे प्राण घेतले होते.
दरम्यान राज्यघटना दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २००८ मधील मुंबई दहशतवादी हल्ल्याचेही स्मरण केले. ते म्हणाले की आज भारत राज्यघटना दिन साजरा करत असताना याच दिवशी जेव्हा दहशतवाद्यांनी, मानवतेच्या शत्रूंनी भारतावर सर्वात भयानक हल्ला केला. त्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना देश आज विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आहे.
यानिमित्त परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचीही सूचक प्रतीक्रिया आली आहे. जयशंकर यांनी सांगितले की मुंबई हल्ल्यातीलल कटाचे सूत्रधार आजही विदेशातबसले आहेत. त्यांना लवकरात लवकर न्यायाच्या चौकटीत आणणे आवश्यक आहे.
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटले की मुंबईवरील हल्ल्याची योजना ज्यांनी आखली आणि प्रत्यक्षात नेली त्यांना न्यायासनासमोर आणून कठोर शासन व्हावे. जयशंकर म्हणाले, 'आंतरराष्ट्रीय समुदायाचे जबाबदार सदस्य या नात्याने आमच्यावरील आघात लक्षात ठेवणे आणि गुन्हेगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या प्रयत्नांमध्ये ठाम राहणे हे आवश्यक आहे.'
भारताच्या स्थायी प्रतिनिधी आणि संयुक्त राष्ट्रातील राजदूत रुचिरा कंबोज यांनी अलीकडेच सांगितले होते की दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी "गंभीर धोका" आहे. इसिस आणि अल-कायदाशी संलग्न आणि प्रेरित गट विशेषतः आशिया आणि आफ्रिकेतील नागरिक आणि सुरक्षा दलांना आजही लक्ष्य करत आहे याकडेही भारताने जगाचे लक्ष वेधले होते.
...तोवर भारत स्वस्थ बसणार नाही -
परराष्ट्रमंत्र्यांनी मुंबई हल्ल्याशी संबंधित एक छोटा व्हिडिओ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेशही शेअर केला. १ मिनिट ३६ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये पंतप्रधानांनी निर्धार व्यक्त केला आहे की "भारतावरील एक हल्लासुद्धा खूप मोठा आहे. आमच्या देशातील एकाही नागरिकाचा जीव गेला तरी ती मोठी हानी आहे. जोपर्यंत दहशतवादाचा समूळ नायनाट होत नाही तोपर्यंत भारत स्वस्थ बसणार नाही."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.