JNU Controversy: विद्यापीठ भिंतीवर ब्राम्हणविरोधी घोषणा, तत्काळ चौकशीचे आदेश

संबंधित विभागाचे डीन आणि तक्रार समितीला चौकशी करण्याचे आदेश कुलगुरूंनी दिले
Argument in JNU and ABVP leaders
Argument in JNU and ABVP leadersArgument in JNU and ABVP leaders
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) आवारातील अनेक भिंतींवर ब्राह्मण व वैश्य जातींच्या विरोधात घोषणा लिहील्याचे प्रकरण तापले असून विद्यापीठ प्रशासनाने याच्या तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.

जेएनयूच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्राच्या (स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज) इमारतीतील भिंती काही जातींच्या विरोधातील घोषणांनी विद्रूप केल्याचे निदर्शनास आल्यावर दिल्लीतील विद्यापीठे व महाविद्यालयीन वर्तुळात तणावाचे वातावरण आहे.

दरम्यान जेएनयू प्रशासनाने या घटनेचा निषेध केला असून संबंधित विभागाला या प्रकाराची चौकशी करून त्वरित अहवाल देण्याचे निर्देश कुलगुरू शांतीश्री पंडित यांनी दिले आहे. विद्यापीठ परिसरात काही अज्ञात घटकांनी आवाराच्या भिंती आणि प्राध्यापकांच्या खोल्या विद्रुप केल्याच्या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

प्रशासनाने या घटनेचा निषेध केला आहे. या प्रकरणी संबंधित विभागाचे डीन आणि तक्रार समितीला चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास कुलगुरूंनी सांगितले आहे, असे जेएनयूने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. जेएनयू म्हणजे समावेश आणि समानता आहे. या आवारातील अशा कोणत्याही प्रकारचे हिंसाचारी कृत्य सहन करणार नाही याचाही पुनरुच्चार निवेदनात करण्यात आला आहे.

दरम्यान जेएनयूतील नलिनकुमार महापात्रा, राज यादव, प्रवेश कुमार आणि वंदना मिश्रा यांच्यासह अनेक प्राध्यापकांच्या दालनांच्या भिंतींवरही '(संघ)शाखेकडे परत जा' असे लिहिल्याचे आढळले होते. दरम्यान जेएनयू शिक्षक संघटनेने भिंतींच्या विद्रुपीकरणाचा निषेध करणारे ट्विट करताना या प्रकारासाठी "डावे-उदारमतवादी टोळी" च जबाबदार असल्याचेही म्हटले आहे.

संघाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही या प्रकाराबद्दल डाव्या विचारांच्या संघटनांवर आरोप केले आहेत. अभाविपचे अध्यक्ष रोहित कुमार यांनी सांगितले की शैक्षणिक संस्थांचे आवार वादविवाद आणि चर्चेसाठीच वापरली गेली पाहिजेत. समाज आणि विद्यार्थी समुदायामध्ये विष पसरवण्यासाठी विद्यापीठाच्या भिंती नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.