Narendra Modi : ‘कर्तव्यपथा'वरील तपश्चर्येत नरेंद्र मोदी आजही मग्न!

३३ वर्षांपूर्वी जेव्हा गुजरातच्या वडनगरमधील दामोदरदास मोदी यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंसकारांनंतर काही तासांतच त्यांचे पुत्र नरेंद्र त्याच दिवशीच झालेल्या भाजपच्या अहमदाबादमधील ठरलेल्या ‘विशेष' बैठकीसाठी उपस्थित झाले होते.
Narendra Modi
Narendra ModiSakal
Updated on
Summary

३३ वर्षांपूर्वी जेव्हा गुजरातच्या वडनगरमधील दामोदरदास मोदी यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंसकारांनंतर काही तासांतच त्यांचे पुत्र नरेंद्र त्याच दिवशीच झालेल्या भाजपच्या अहमदाबादमधील ठरलेल्या ‘विशेष' बैठकीसाठी उपस्थित झाले होते.

नवी दिल्ली - ही १९८९ मधील घटना आहे... तब्बल ३३ वर्षांपूर्वी जेव्हा गुजरातच्या वडनगरमधील दामोदरदास मोदी यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंसकारांनंतर काही तासांतच त्यांचे पुत्र नरेंद्र त्याच दिवशीच झालेल्या भाजपच्या अहमदाबादमधील ठरलेल्या ‘विशेष' बैठकीसाठी उपस्थित झाले होते. तेव्हाही उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र‘ माझ्यासाठी माझे कर्तव्यही महत्वाचे आहे,' अशी भावना त्यांनी सहकाऱयांशी बोलताना व्यक्त केली होती.... त्याच नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान असताना आपल्या मातोश्री हिराबा यांच्या अंत्यसंस्कारांनंतर अक्षरशः काही मिनिटांतच पश्चिम बंगालच्या विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावून ‘कर्तव्यपथा‘वरील त्याच प्रवासाची पुनरावृत्ती केली...मोदी यांचे जुने सहकारी व ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते दिलीप त्रिवेदी यांनी त्यांच्या त्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

आज सकाळी फक्त मोदी कुटुंबीयांच्या उपस्थितीत व विलक्षण साधेपणाने हिराबा यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर काही मिनिटांतच पंतप्रधान मोदी यांनी थेट गुजरातच्या राजभवनावर जाऊन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. तेव्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह उपस्थितच नव्हे तर सारे जग अवाक झाले. मोदी यांनी धीरगंभीरपणे कार्यक्रमात भाषणही केले. त्यांनी पश्चिम बंगालसाठी हजारो कोटी रूपयांच्या विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच हावडा- न्यू जलपाईगुडी दरम्यान धावणाऱया वंदे भारत रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखविला. मोदी यांच्या कर्तव्यपथावरील या तपश्चर्येबाबत सारे जग प्रशंसोत्गार काढत असले तरी मोदी यांचा ‘पिंड'च एका कर्तव्यदक्ष कार्यकर्त्याचा असल्याचे त्रिवेदी यांच्या या छोट्या आठवणीतून जगासमोर आले. पत्रसूचना कार्यालयाच्या (पीआयबी) माध्यम मित्र गटाच्या माध्यमातून त्रिवेदी मोदी यांची ‘ती‘ खास आठवण लोकांपर्यंत पोहोचली.

त्रिवेदी यांनी सांगितले की आम्ही जेव्हा १९८९ मध्ये अहमदाबादेतील त्या विशेष बैठकीसाठी पोहोचलो तेव्हा आम्हाला समजले की नरेंद्रभाईंच्या वडिलांचे निधन झाल्याने ते वडनगरला गेले आहेत. तेव्हा ते बैठकीला येणार नाहीत असे समजून आम्ही दुपारी बैठकीला सुरवात केली. मात्र काही वेळातच नरेंद्रभाई बैठकीला आले व त्यांनी बैठकीची सूत्रे हाती घेतलीतेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. बैठक झाल्यावर कार्यकर्त्यांनी जेव्हा त्यांना वडिलांच्या निधनाबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले की ‘‘हो, वडिलांवर आता थोड्या वेळापूर्वीच अंत्यसंस्कार झाले. पण ही बैठकही महत्वाची होती व माझे बैठकीत उपस्थित असणेही महत्वाचे होते. कारण आपल्याला तर पुढे काम करायचे आहे.‘‘ त्यांची कार्याप्रती कटिबध्दतेचे ते उदाहरण आम्हालाच नव्हे तर पुढच्या पिढ्यांच्याही लाखो कार्यकर्त्‍यांसाठी वेळोवेळी प्रेरणादायी ठरले आहे, अशी भावना त्रिवेदी यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.