नवी दिल्ली- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसेन्स मिळवण्याबाबत नव्या नियमांची घोषणा केली आहे. १ जून पासून हे नवीन नियम लागू होतील. याअंतर्गत पूर्वीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. १ जून पासून लोकांना ड्रायव्हिंग टेस्ट आरटीओच्या ऑफिसला जाऊन देण्याची गरज पडणार नाही. खासगी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये लोकांना टेस्ट देता येईल. त्यानंतर हे स्कूल यासंदर्भातील सर्टिफिकेट देऊ शकतील.
प्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीने हे नवीन नियम महत्त्वाचे असल्याचं बोलले जाते. वेगाने वाहन चालवण्यासाठीचा दंड एक हजार ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान असणार आहे. पण, जर अल्पवयीन मुलगा वाहन चालवताना आढळला तर त्याला २५ हजार दंड भरावा लागेल. शिवाय, वाहन धारकाची नोंदणी रद्द केली जाईल. तसेच वयाचे २५ वर्षे होईपर्यंत अल्पवयीन चालकाला ड्रायव्हिंग लायसेन्स मिळवता येणार नाही.
कागदपत्रांची गरज कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सरकारच्या ताफ्यातील जवळपास ९ हजार वाहने स्क्रॅपमध्ये काढण्याचा आणि प्रदूषण उत्सर्जन मानके सुधारण्याचा प्रयत्न असणार आहे.
खासगी ड्रायव्हिंग स्कूल सेंटरकडे किमान १ एकर जागा असणे आवश्यक असणार आहे. फोर व्हिलरसाठी ट्रेनिंग देण्यात येणार असेल तर अशावेळी २ एकर जागा असणे आवश्यक असेल. ट्रेनरकडे किमान डिप्लोमा हवा, पाच वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव, बायोमेट्रिक, आयटी सिस्टिमची त्याला माहिती असावी.
लाईट मोटार व्हेईकल (LMV) साठी चार आठवड्यामध्ये २९ तासांच्या ट्रेनिंगची आवश्यकता असेल. त्यातील ८ तास थेरी आणि २१ तासाच्या प्रॅक्टिकलचा समावेश असेल. हेवी मोटार व्हेईकलसाठी (HMV) सहा आठवड्यांच्या काळात ३८ तासांचे ट्रेनिंग लागेल. त्यात आठ तासांची थेरी सांगितली जाईल.
नवीन नियमानुसार, शिकावू लायसेन्ससाठी १५० रुपये आकारले जातील. टेस्टसाठी किंवा रिपिट रेस्टसाठी ५० रुपये अतिरिक्त आकारले जातील. ड्रायव्हिंग टेस्टसाठी ३०० रुपये आकारले जातील. लायसेन्स जारी करण्यासाठी २०० रुपये लागतील. नवीन क्लास मिळवण्यासाठी ३०० रुपयांची शुल्क आकारले जाईल.
ड्रायव्हिंग स्कूलनी ट्रेनिंगशिवाय ड्रायव्हिंग लायसेन्स दिल्यास ५ हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. डुप्लिकेट लायसेन्स मिळवण्यासाठी ५०० रुपये लागतील. लायसन्स जारी करणाऱ्या ऑथेरिटीच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी नियम २९ नुसार पाचशे रुपये लागतील. ड्रायव्हिंग लायसेन्सवरील पत्ता बदलणे किंवा इतर माहिती बदलायची असल्यास २०० रुपये शुल्क लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.