M Phil इतिहास जमा, PhD साठी नियम बदलले

news education policy no need mphill for phd
news education policy no need mphill for phd
Updated on

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी दिली. यामुळे भारतीय शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल होणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी प्रमुख के कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखालील समितीने मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे अहवाल सादर केला होता. नवं शैक्षणिक धोरण नव्या आव्हानांचा सामना कऱण्याच्या दृष्टीने आणि भारतीय परंपरा, समाज यांच्याशी सुसंगत असं तयार करण्यात आलं आहे. यामुळे भारताच्या शिक्षण पद्धतीच्या सर्व बाबी लक्षात घेण्यात आल्या आहेत. 

नव्या शैक्षणिक धोरणात बदल करताना भाषेचा पर्याय वाढवण्यात आला आहे. विद्यार्थी 2 ते 8 वर्षांपर्यंत भाषेचं ज्ञान लवकर आत्मसात करू शकतात. यासाठी त्यांना सुरुवातीलाच मातृभाषेसह तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना सहावी ते आठवीच्या दरम्यान दोन वर्षांच्या भाषा अभ्यासक्रमाचाही समावेश आहे. 

पत्रकार परिषदेत नव्या शैक्षणिक धोरणाची माहिती देण्यात आली. संशोधन करणाऱ्यांसाठी चार वर्षांचा डीग्री प्रोग्रॅम असणार आहे. याव्यतिरिक्त इतरांसाठी तीन वर्षांचा डीग्री प्रोग्रॅम असेल. संशोधन करणाऱ्यांसाठी एक वर्षाच्या एमए सह चार वर्षांची डीग्री झाल्यानंतर पीएचडी करू शकतात. यासाठी आता एमफीलची गरज नसेल. त्यामुळे एमफील आता इतिहासजमा होणार आहे. 

1968 मध्ये जेव्हा नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आलं तेव्हापासून तीन भाषांचा फॉर्म्युला कायम आहे. त्यानंतर 1986, 1992 आणि 2005 च्या शैक्षणिक धोरणातही यात बदल करण्यात आला नाही. आता नव्या शिक्षण धोरणातही तीन भाषांचा फॉर्म्युला कायम ठेवला आहे. 

शालेय स्तरावर शारीरीक शिक्षणाचे महत्व आणखी वाढणार आहे. फिजिक्ल अॅक्टिव्हीटी आणि एक्सरसाइजचा यामध्ये समावेश असेल. याच क्रीडा, योगा, मार्शल आर्ट्स, डान्स यासह स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांनुसार अभ्यासक्रम ठरवले जातील. 

नव्या शैक्षणिक धोरणात महत्वाचा झालेला बदल म्हणजे पदवीपूर्व शिक्षणाची पुनर्रचना करण्यात येईल. 10+2 याऐवजी 5 + 3 + 3 + 4  असा पॅटर्न होणार आहे. यामुळे आता दहावी बारावीच्या परीक्षा रद्द होणार आहेत. संख्या आणि अक्षर ओळख होण्यासाठी विशेष भर देण्यात य़ेणार असून हसत खेळत शिक्षणासाठी आग्रही असणार आहे. याशिवाय एकाच वेळी दोन वेगवेगळ्या शाखांमध्ये शिक्षण घेता येणार आहे. सर्व विद्यापीठांसाटी नियम सारखे असणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.