नवी दिल्ली - भारतात सध्या कोरोनाची (Corona) दुसरी लाट (Second Wave) आली आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येसह मृतांची आकडेवारीसुद्धा वाढली होती. आता हळू हळू रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण (Vaccination) मोहिमसुद्धा सुरु आहे. तसंच काही राज्यांनी कडक लॉकडाऊन केलं आहे. त्यातच आता केंद्र सरकारने (India Government) कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क(Mask), सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) आणि सॅनिटायझर (Sanitizer) यांच्याबाबत नव्या गाइडलाइन्स (New Guidelines) जारी केल्या आहेत. (new-guideline-for-mask-and-social-distancing-by- government-of-india)
केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांच्या कार्यालयाने नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, खोकला आणि शिंक यामुळे दहा मीटरपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागेल असं म्हटलं आहे. कोरोनाबाबत नव्या गाइडलाइननुसार, कोणत्याही संसर्ग झालेल्या व्यक्तीचा खोकला किंवा शिंक यामुळे व्हायरस पसरण्याचा धोका असतो. अशा रुग्णाच्या ड्रॉपलेटमधून (शिंक किंवा खोकल्यानंतर नाक, तोंडातून बाहेर फेकले जाणारे थेंब) 10 मीटरपर्यंत विषाणू हवेत जाऊ शकतो.
मास्क घालणं गरजेचं असून सोशल डिस्टन्सिंगचं पालनही करणं कोरोनापासून वाचण्यासाठी आवश्यक आहे. लक्षणं दिसत नसलेल्या रुग्णांपासूनही कोरोना पसरू शकतो. याशिवाय शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर जमिनीवर पडलेल्या थुंकीतून निघणाऱ्या कणांपासूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो असं गाइडलाइन्समध्ये म्हटलं आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये रस्त्यावर थुंकल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.
सरकारी पॅनेलने हाय कॉन्टॅक्ट पॉइंट्सची नियमित आणि सातत्याने स्वच्छता करण्यास सांगितलं आहे. यामध्ये दरवाजाचे हँडर्स, लाइट स्विच, टेबल, खुर्च्या यांचा समावेश आहे. तसंच ब्लिच किंवा फिनाइल याने स्वच्छ करा असंही सांगण्यात आलं आहे. लोकांनी कोरोनापासून वाचण्यासाठी डबल मास्क किंवा N95 मास्क घालावा. जर कॉटनच्या कपड्याचा मास्क असेल तर दोन मास्क गालायला हवेत. सर्जिकल मास्क असल्यास एकच मास्क चालेल.
नव्या गाइडलाइननुसार, सर्जिकल मास्क असल्यास त्याचा एकदाच वापर करता येईल. मात्र डबल मास्क असेल तर तुम्ही पाच वेळा वापरू शकता. इतकंच नाही तर व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी कोरोना पसरण्याचा धोका कमी आहे. त्यामुळे घरी आणि कामाच्या ठिकाणी व्हेंटिलेशन चांगलं असायला हवं. त्यामुळे तुम्हाला कोरोनाचा धोका कमी असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.