Corona JN.1 Variant: कोरोनाचा ‘जेएन.१’ उपप्रकार चिंतेची बाब; WHOचा इशारा, सार्वजनिक आरोग्याला धोका नाही

नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर जग कोरोनाच्या ‘जेएन.१’ या उपप्रकाराच्या पसरत चाललेल्या संसर्गामुळे पुन्हा धास्तावले आहे.
JN.1 Covid
JN.1 Covidesakal
Updated on

नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर जग कोरोनाच्या ‘जेएन.१’ या उपप्रकाराच्या पसरत चाललेल्या संसर्गामुळे पुन्हा धास्तावले आहे. भारतातही त्याचे रुग्ण आढळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, ‘जेएन.१’ हा उपप्रकार चिंतेची बाब असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) नमूद केले आहे. अर्थात, सार्वजनिक आरोग्याला धोका कमी असल्याचा दिलासाही ‘डब्लूएचओ’ने दिला आहे.(Latest Marathi News)

जागतिक आरोग्य संघटनेने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे, की कोरोनाच्या ‘जेएन.१’ या विषाणुची यापूर्वीच ‘बीए २.८६’ या प्रकारातील चिंता करण्यासारखा उपप्रकार म्हणून वर्गवारी करण्यात आली आहे. मात्र, अलीकडच्या काही आठवड्यांत अनेक देशांत ‘जेएन.१’ चे रूग्ण आढळत असून जगभरातच त्याचा संसर्ग वाढत आहे. भारतातही केरळमध्ये या उपप्रकाराचा पहिला रूग्ण आढळला आहे.

JN.1 Covid
Corona JN.1 Variant: "काळजी घेण्याची गरज पण..."; कोरोनाच्या ‘जेएन.१’ उपप्रकाराबाबत WHO चं स्पष्टीकरण

इन्फ्लूएंझा किंवा फ्लूसंदर्भातील सर्व डेटा शेअर करण्याच्या उपक्रमांतर्गत कोरोनाचा ‘जेएन.१’ हा विषाणू ‘बीए २.८६’ चा वंशज असल्याचे अहवाल देण्यात आले आहेत. वेगाने होणारा प्रसार पाहता त्याचा मूळ विषाणुव्यतिरिक्त चिंता करण्यासारखा उपप्रकार म्हणून स्वतंत्र वर्गीकरण करण्यात आले आहे, अशी माहितीही संघटनेने दिली आहे.

कोरोनाचा ‘जेएन.१’ हा उपप्रकार चिंतेची बाब असली तरी सध्या उपलब्ध असलेल्या मर्यादित पुराव्यानुसार या उपप्रकाराचा जागतिक आरोग्याला कमी धोका आहे, असा दिलासाही डब्लूएचआेने दिला आहे. विशेषत: हिवाळ्याची सुरुवात झालेल्या देशांमध्ये या उपप्रकारामुळे सार्सच्या रुग्णांचे प्रमाण वाढू शकते. तसेच नेहमीच्या विषाणुजन्य व जिवाणुजन्य संसर्गातही वाढ होऊ शकते. भारतासह अमेरिका, चीन, सिंगापूर आदी देशांत या उपप्रकाराचे रूग्ण आढळले आहेत. (Marathi Tajya Batmya)

JN.1 Covid
New Laws : फौजदारी कायद्यात बदल; मॉब लिचिंग केल्यास होणार फाशीची शिक्षा; शहांची लोकसभेत माहिती

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून आढावा

‘जेएन.१’ च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी बुधवारी देशातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. केंद्राकडून राज्यांना सर्व ती मदत दिली जात असल्याचे सांगून सावध राहण्याची गरज असली तरी घाबरण्याचे काही कारण नाही, असेही त्यांनी पत्रात म्हटले. दरम्यान, मार्गदर्शक तत्त्वांनुसार चाचण्या करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

JN.1 Covid
PM face for INDIA bloc : 'हो! मीच मांडला खरगेंचा प्रस्ताव'; पंतप्रधानपदाचा उमेदवार का? ममतादिदी स्पष्टच बोलल्या

कोरोनाचा ‘जेएन.१’ विषाणू काय आहे?

कोरोनाच्या ‘बीए.२.८६’ या प्रकाराचा ‘जेएन.१’ उपप्रकार आहे. पिरोला म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या ‘बीए.२.८६’ प्रकारात स्पाईक प्रोटिनमध्ये ३० पेक्षा अधिक उत्परिवर्तने झाली होती. त्यामुळे, प्रतिकारशक्ती भेदण्याची अधिक क्षमता या प्रकारात निर्माण झाली. त्यामुळे, या प्रकारावर व त्यातून निर्माण होणाऱ्या उपप्रकारावर शास्त्रज्ञांचे लक्ष होते. ‘जेएन.१’ ची लक्षणे कोरोनाच्या इतर प्रकारांसारखीच आहेत. कोरोनावरील सध्याची उपचारपद्धती व अद्ययावत लशीमुळे या उपप्रकाराच्या संसर्गाला आळा बसण्याचा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.

भारतात २१ रुग्णांची नोंद

कोरोनाच्या ‘जेएन.१’ या उपप्रकाराचा संसर्ग झालेले एकूण २१ रूग्ण आत्तापर्यंत देशात आढळले आहेत. त्यापैकी १९ रूग्ण एकट्या गोव्यात सापडले असून केरळ व महाराष्ट्रातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनी दिली. दरम्यान, मे २०२१ पासून देशात एका दिवसात प्रथमच कोरोनाचे उच्चांकी ६१४ रुग्ण आढळले आहेत. सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या २,३११ आहे.

JN.1 Covid
पुन्हा वाद चिघळणार! 'कावेरी'ने कर्नाटक सरकारला दिले तामिळनाडूला 3128 क्युसेक पाणी सोडण्याचे आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.