New Parliament: उद्घाटन कार्यक्रमावर काँग्रेस, NCP, शिवसेनेसह 19 विरोधीपक्षांचा बहिष्कार; 'हे' पक्ष मात्र भाजपसोबत

राष्ट्रवादी काँग्रेसनं नुकतीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
New Parliament
New ParliamentSakal
Updated on

नवी दिल्ली : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरुन देशभरात सध्या मोठा गदारोळ सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या नव्या भवनाचं उद्घाटन होणार आहे. पण विरोधकांनी मोदींच्या हस्ते उद्घाटनाला जोरदार विरोध केला आहे.

त्यामुळं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह १९ विरोधीपक्षांनी या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. तर इतर १४ विरोधीपक्षांचा मोदींना पाठिंबा आहे. (New Parliament 19 opposition parties Boycott of including Congress NCP Shiv Sena on inauguration of new parliament building)

नवीन संसद भवनाचं उद्घाटन हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हायला हवं, अशी विरोधकांची मागणी आहे. ज्या पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे त्यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डीएमके, जदयू, आप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), माकप, समाजवादी पार्टी, राजद, एमआयएम या पक्षांचा समावेश आहे. (Latest Marathi News)

New Parliament
Eknath Shinde: ठाकरे-केजरीवाल भेटीवर प्रश्न विचारताच CM शिंदे भडकले; म्हणाले, कोणीही...

तर ज्या विरोधी पक्षांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये टीडीपी, शिरोमणी अकाली दल, वायएसआर काँग्रेस या प्रमुख पक्षांसह बिजू जनता दल, एजेएसयू, अद्रमुक, एआययुडीएफ, जेडीएस, मिझो नॅशनल पार्टी, नाना पिपल्स फ्रन्ट, एनडीपीपी, एरएसएल आणि एसकेएम या पक्षांचे खासदार उपस्थित राहणार आहेत. (New Parliament)

New Parliament
Kharip Review Meeting: "शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येणार नाही"; CM शिंदेंनी दिल्या 'या' सूचना

यामध्ये अद्याप भाकप, झारखंड मुक्ती मोर्चा, नॅशनल कॉन्फरन्स, भारत राष्ट्र समिती, राष्ट्रीय लोक दल या काही विरोधी पक्षांनी आद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.