नव्या संसदेतील 'एसी'ने खासदार हैराण! तब्येत खालावल्याने मतदानाच्या वेळी सोनिया गांधी गैरहजर

new parliament
new parliament
Updated on

नवी दिल्ली - देशाला संसदेची नवी इमारत मिळाली आहे. 19 सप्टेंबर रोजी सर्व खासदार नवीन इमारतीत दाखल झाले. त्यानंतर महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले. विधेयकाच्या श्रेयवादावरून नव्या संसद भवनातील राजकीय वातावरणही तापले होते. मात्र तेथे बसवण्यात आलेल्या शक्तिशाली एसींमुळे (एअर कंडिशन्स) खासदार थंडीने गारठल्याचं चित्र आहे.

new parliament
Election Update:पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा, या महिन्याच्या शेवटला घेतला जाणार जनमताचा कौल

एसीच्या कमी केलेल्या तापमानामुळे काही खासदारांची प्रकृती ढासळल्याचं सांगण्यात येत आहे. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, थंडीमुळे काँग्रेस नेते अखिलेश प्रसाद सिंह यांची प्रकृती खालावली होती. त्याच्या हातात औषधाचे पाकीटही दिसले.

अखिलेश यांनी सांगितले होते की, नवीन संसदेतील एसी खूप शक्तीशाली आहे. त्यामुळे अर्धा डझनहून अधिक खासदारांची प्रकृती खालावली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनाही थंडीमुळे त्रास झाल्याचे सांगण्यात आले. याच कारणामुळे लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर मतदान होणार होते, तेव्हा त्या उपस्थित नव्हत्या.

new parliament
Dhangar Reservation: आरक्षणमिळेपर्यंत धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या योजना लागू करणार; CM शिंदेंची घोषणा

सध्या याबाबत सभापतींकडे तक्रार करण्यात आली आहे. तसेच थंडीबाबत काही कार्यवाही करण्यास सांगितले आहे. यावर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नसून, नवीन संसद भवनातील एसी जास्त प्रमाणात थंड होत असून त्यामुळे खासदारांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com