Parliament Building: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त नव्या संसदेवर फडकणार तिरंगा, तयारी सुरू

PM Narendra Modi
PM Narendra Modiesakal
Updated on

New Parliament Building: संसदेचे विशेष अधिवेशन सुरू व्हायला अजून पाच दिवस बाकी आहेत, मात्र त्याआधीच मोठी माहिती समोर आली आहे. संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर विश्वकर्मा पूजेच्या निमित्ताने 17 सप्टेंबरला नवीन संसद भवनावर औपचारिकपणे तिरंगा फडकवण्याची योजना असल्याचे सांगण्यात येत आहे. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वाढदिवस आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिलं आहे.

PM Narendra Modi
Sanatana Dharma Row : युपी-बिहारनंतर उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात मुंबईत एफआयआर; काय आहे प्रकरण?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत चालणारे विशेष अधिवेशन जुन्या इमारतीत सुरू होणार आहे. त्यानंतर संसद भवनाचे पुढील कामकाज नवीन संसदेत होईल. 28 मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नव्या संसदेत होणारे हे पहिले अधिवेशन असेल.

PM Narendra Modi
Maratha Andolan : CMच्या 'बोलून मोकळं व्हायचं', ‘त्या’ व्हिडीओवर ओमराजे संतप्त; म्हणाले, 'मराठा आरक्षणाविषयी…

मंगळवारी नवीन इमारतीचे बांधकाम करणाऱ्या केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने सार्वजनिक संबोधन प्रणाली भाड्याने घेण्यासाठी निविदा जारी करून तीन औपचारिक प्रवेशद्वारांपैकी एक असलेल्या गज गेटसमोर "राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभाची" तयारी सुरू केली. यासंबंधीत दोन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन इमारतीत अशाप्रकारे पहिल्यांदाच ध्वजारोहण होणार आहे.

या विशेष अधिवेशनाबाबत अनेक घडामोडी घडत आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहात नवा ड्रेस कोडही लागू केला जाणार आहे. लोकसभेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या आत आणि बाहेरील कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.