New Parliament Building : संसदेचे हिवाळी अधिवेशनादरम्यान कामकाज सुरू असतानाच संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लोकसभा सभागृहात कामकाजादरम्यान दोन अज्ञात व्यक्ती घुसल्याच्या प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. अशा स्थितीत नव्या संसदेत सुरक्षा व्यवस्थेमध्ये चूक कशी घडली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
13 डिसेंबर 2001 रोजी सध्याच्या संसदेवर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात 9 सुरक्षा जवान शहीद झाले होते. ज्यामध्ये दिल्ली पोलिसांचाही समावेश होता.
यानंतर संसदेच्या सुरक्षेबाबत अनेक मोठी पावले उचलण्यात आली, जेणेकरून पुन्हा कोणीही असं कृत्य करू नये. नव्या संसदेतही कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. आताच्या संसदेपेक्षा ती कशी वेगळी आहे ते पाहूया
१. नवीन संसद भवनात अशा अनेक सुरक्षा व्यवस्था आहेत, ज्या जुन्या संसद भवनात नाहीत. नवीन संसदेत 360-डिग्री सीसीटीव्ही सुविधा आहे. त्याची खास बाब म्हणजे हे सीसीटीव्ही कॅमेरे चेहरा ओळखण्यात मदत करतील. त्यामुळे कोणत्याही संशयित व्यक्तीला संसदेत प्रवेश करणे कठीण होईल.
२. नव्या संसदेत घुसखोरांना रोखण्यासाठी ठोस व्यवस्था करण्यात आली आहे. थर्मल इमेजिंग सिस्टीम कोणत्याही घुसखोराचा शोध घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. याशिवाय कोणत्याही अनुचित घटनेला सामोरे जाण्यासाठी फायर अलार्म यंत्रणा असेल. आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अग्निशमन यंत्रणा पुरविण्यात आली आहे.
३. संसद भवनातील कर्मचारी आणि खासदार यांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक शस्त्रे आणि उपकरणांनी सुसज्ज सुरक्षा दल आहे. संसद भवनात कोणत्याही संशयास्पद व्यक्तीला रोखण्यासाठी अनेक अडथळे निर्माण करण्यात आले आहेत. हे अडथळे भिंती, कुंपण आणि पोस्टच्या स्वरूपात आहेत.
४. दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट आणि आग यांसह विविध धोक्यांपासून संसद भवनाचे संरक्षण करता येईल, अशा आधुनिक पद्धतीने नवीन संसदेची सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात आली आहे. या नवीन सुरक्षा उपायांमुळे खासदार, कर्मचारी आणि अभ्यागतांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात मदत होईल.
५. नवीन संसद भवनात भौतिक सुरक्षेशिवाय अनेक सुरक्षा प्रोटोकॉलही असतील. या प्रोटोकॉलमध्ये प्रवेश नियंत्रणापासून ते अभ्यागत व्यवस्थापनापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असेल. या प्रोटोकॉलचा उद्देश संसदेत सुरक्षित वातावरण निर्माण करणे हा आहे.
खरे तर नवीन संसद भवन ही भारताच्या लोकशाहीच्या सुरक्षेतील एक महत्त्वाची गुंतवणूक आहे. यात करण्यात आलेल्या सुरक्षा उपायांची रचना ही इमारत आणि त्यात राहणाऱ्या लोकांना विविध धोक्यांपासून संरक्षण देण्यासाठी करण्यात आली आहे. या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे भारतातील लोकशाही आणि स्थैर्याचे प्रतीक म्हणून भारताची संसद निर्भयपणे उभी राहील याची खात्री बाळगली गेली होती. मात्र तरीही आज झालेल्या घटनेमुळे ही सुरक्षाव्यवस्था कितीपत विश्वसनीय आहे या बद्दल शंका निर्माण झाली आहे हे नक्की.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.