पोलिसांसाठी नवीन सोशल मीडिया गाईडलाईन्स! वर्दीसह इतर साहित्यासह रिल्स-व्हिडीओ बनविण्यास बंदी

Social Media
Social Media
Updated on

नवी दिल्ली - दिल्ली पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी शुक्रवारी सोशल मीडियाबाबत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. पोलिस गणवेशाची प्रतिष्ठा राखली जावी यासाठी रिल्स किंवा व्हिडिओ बनवताना पोलिस यंत्रणेचे कोणतेही उपकरण किंवा साहित्य वापरू नये, याबाबत निर्देश अरोरा यांनी दिले आहेत.

Social Media
महापालिकेचा इशारा! ३१ ऑगस्टपर्यंत कर भरा, अन्यथा मालमत्तेवर चढेल बोजा; ५ ते ६ टक्क्यांची सवलत आता ३१ ऑगस्टपर्यंतच

या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पोलिस कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रलंबित खटल्याशी संबंधित गोपनीय माहिती, टिप्पणी, पोस्ट किंवा शेअर करू नये. संशयित किंवा अटक केलेल्या व्यक्तीशी संबंधित गोपनीय माहिती शेअर करू नये.

पोलिस कर्मचाऱ्यांनी लेखी परवानगीशिवाय विभागीय प्रशिक्षण, उपक्रम किंवा कर्तव्यांशी संबंधित कोणतेही विधान, फोटो, रिल्स किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करू नये. तसेच, पीडित, संशयित किंवा कोणत्याही गटासाठी आक्षेपार्ह टिप्पणी पोस्ट करणे टाळावे, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.

Social Media
कृषीमंत्री असताना तुम्ही किती मदत केली हे सांगा; गिरीश महाजनांचा शरद पवारांना सवाल

अल्पवयीन किंवा लैंगिक अत्याचार करणाऱ्या तक्रारदाराची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून उघड करणे बेकायदेशीर असल्याचेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. एखाद्या उच्च पदस्थ व्यक्तीची किंवा अतिसुरक्षित क्षेत्राची/ परिसराची छायाचित्रे किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करणे आणि प्रसारित करणे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. शिवाय पोलिसांनी देशहित किंवा अंतर्गत सुरक्षेच्या विरोधातील कोणतेही साहित्य सोशल मीडियावर पोस्ट करू नये, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

त्याचबरोबर पोलिस कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर टाकलेला मजकूर बेकायदेशीर, अश्लील, मानहानीकारक, धमकावणारा किंवा अधिकारांचा गैरवापर करणारा असू नये, असेही मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन करणारी कोणतीही पोस्ट करू नये.

कोणत्याही धर्म, जात, पंथ किंवा पोटजातीच्या विरोधात प्रचार किंवा आंदोलन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कोणत्याही गटात किंवा व्यासपीठावर त्यांचा सहभाग बेकायदेशीर आहे. कोणत्याही राजकीय विषयाविरोधात सोशल मीडियावर सुरू असलेल्या मोहिमेत सहभागी होण्यास पोलिसांना बंदी घालण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.