Satyapal Malik : सत्यपाल मलिक प्रकरणात नवा ट्विस्ट! मलिक म्हणाले, सीबीआय स्वतःच माझ्या घरी..

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय.
Former Governor of Jammu and Kashmir Satyapal Malik
Former Governor of Jammu and Kashmir Satyapal MalikSatyapal Malik
Updated on
Summary

हे संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर जाट समाजाकडून सत्यपाल मलिकांचं सोशल मीडियावर समर्थन केलं जात आहे.

Delhi News : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलाय. मलिक यांनी 'एबीपी लाइव्ह'शी संवाद साधताना मोठा खुलासा केलाय.

मला केंद्रीय तपास संस्थेच्या (CBI) कार्यालयात जाण्याची गरज नाही. उलट सीबीआयचे अधिकारी स्वत: मला भेटायला घरी येतील, असं मलिकांनी म्हटलंय.

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या सततच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. दरम्यान, सीबीआयनं त्यांना समन्स बजावल्याचं प्रकरण चव्हाट्यावर आलं होतं. यानंतर काँग्रेस आणि आपचे नेते केंद्र सरकारला घेराव घालत आहेत. मात्र, या प्रकरणी सत्यपाल मलिक यांनी सीबीआयनं आपल्याला समन्स पाठवलं नसून स्पष्टीकरण मागितल्याचा खुलासा केलाय.

Former Governor of Jammu and Kashmir Satyapal Malik
Karnataka Election : मला फक्त आदर हवाय, सत्तेची भूक नाही; काँग्रेसमध्ये दाखल होताच शेट्टरांचा भाजपवर निशाणा

'मला सीबीआयकडून कोणतंही समन्स मिळालेलं नाही, ही केवळ अफवा आहे', असं त्यांनी म्हटलंय. मलिक पुढं म्हणाले, सीबीआय अधिकारी माझी चौकशी करण्यासाठी येणार आहेत. यादरम्यान, अधिकारी माझ्या निवासस्थानी येऊन माझ्याकडून खुलासा मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, या प्रकरणी सीबीआयनं 27 किंवा 28 एप्रिलची वेळ मागितली होती. सत्यपाल मलिक 27-28 एप्रिल रोजी राजस्थानमध्ये राहणार आहेत. यामुळंच 28 एप्रिलनंतर सीबीआयचे अधिकारी त्याच्या घरी पोहोचून त्याच्याकडून खुलासा मागू शकतात.

Former Governor of Jammu and Kashmir Satyapal Malik
Dominic Raab : पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का; उपपंतप्रधान डोमिनिक राब यांचा राजीनामा

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितलं की, जाट समाजाचे 300 प्रतिनिधी शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास माझी भेट घेणार आहेत. मी प्रतिनिधींसोबत मेजवानीलाही उपस्थित राहणार आहे. यादरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर जाट समाजाकडून सत्यपाल मलिकांचं सोशल मीडियावर समर्थन केलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.