Maharashtra Covid19 News: XBB.1.16 सबव्हेरियंटमुळं वाढतेय रुग्णसंख्या, महाराष्ट्रात सर्वाधिक!

Maharashtra Covid19 News Updates: राज्यात 'या' शहरांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात रुग्णांची नोंद झाली आहे.
Maharashtra Covid19 News
Maharashtra Covid19 News
Updated on

Maharashtra Covid19 News : भारतात कोविड 19 च्या XBB.1.16 या नव्या सब व्हेरियंटमुळं रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गेल्या तीन आठवड्यांत ज्या पाच राज्यांत सध्या सर्वाधिक रुग्णसंख्या आहे, त्यापैकी चार राज्यांमध्ये हा सबव्हेरियंट आढळून आला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. पण यामुळं कोरोनाचा आजार तीव्र होतोय, बाधितांना रुग्णालयात दाखल करावं लागतंय किंवा यामुळं मृत्यू होता आहेत याचे काहीही पुरावे समोर आलेले नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. (New XBB.1.16 Covid sub variant spreads amid rise in cases Maharashtra at top)

Maharashtra Covid19 News
Congress Party News: राहुल गांधींच्या शिक्षेविरोधात काँग्रेस मोठ्या आंदोलनाच्या तयारीत; आज राष्ट्रपतींची घेणार भेट!

भारताच्या कोविड 19 जिनोम सिक्वेन्सिंग कॉन्सॉर्टिअमनुसार (INSACOG) मार्च महिन्यात XBB.1.16 हा सबव्हेरियंट २०४ रुग्णांच्या सॅम्पल्समध्ये आढळून आला. त्यापूर्वी १३८ रुग्णांमध्ये तो आढळून आला होता. तर जानेवारी महिन्यात केवळ दोन रुग्णांमध्येच तो आढळला होता. सध्या या सर्व ३४४ रुग्णांना आयसोलेटेड करण्यात आलं आहे.(Latest Marathi News)

Maharashtra Covid19 News
Mahim Dargah News: राज ठाकरेंनी भाषणात उल्लेख करताच तडकाफडकी पाडण्यात आलेल्या माहिमच्या दर्ग्याचा इतिहास

दरम्यान, या सबव्हेरियंटचे सर्वाधिक १०५ रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. हे रुग्ण पुणे, मुंबई, ठाणे, सांगली, अहमदनगर, अमरावती आणि नंदुरबार या जिल्ह्यातील आहेत. यानंतर तेलंगाणामध्ये ९३, कर्नाटकात ५७, गुजरातमध्ये ५४ आणि दिल्लीत १९ रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

तसेच ज्या रुग्णांच्या सँम्पलमध्ये XBB.1.16 हा सबव्हेरियंट आढळून आला आहे त्यांच्या शरिरात हे दोन सबव्हेरियंट XBB.1.5 आणि XBB.2.3 हे दोन सबव्हेरियंट मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत, अशी माहिती INSACOG च्या डेटामधून समोर आला आहे.(Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.